घरटेक-वेकलवकरच Facebook वरून करता येणार व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग!

लवकरच Facebook वरून करता येणार व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग!

Subscribe

सोशल मीडिया अॅप्लिकेशनमधील फेसबुक या अॅपचे जगभरात असंख्य युजर्स आहेत. गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले असताना व्हिडिओ कॉलिंगला सर्वाधिक पसंती युजर्स देत असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत फेसबुक युजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. ती म्हणजे आता लवकरच फेसबुकवरून वरून व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग करता येणार आहे. महामारीच्या सुरूवातीपासून व्हिडिओ कॉलिंगची मागणी वाढली आहे. ऑफिसच्या बहुतेक मिटींग्स व्हिडिओ कॉलिंगद्वारे ऑनलाईन होत आहेत. सुरुवातीला, झूम अॅपचा खूप फायदा झाला, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट टीम्स, गुगल मीट सारखे अॅप्स देखील अनेक फिचर्ससह लाँच करण्यात आले. त्यानंतर फेसबुक सारख्या सोशल मीडिया कंपन्यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजर अॅप्समध्ये व्हिडीओ कॉलिंगसाठी अनेक फिचर्स युजर्सना दिलेत.

आतापर्यंत केवळ व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजर अॅपच्या माध्यमातून व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलिंग करता येते, मात्र आता कंपनी फेसबुकच्या मुख्य अॅपमध्ये व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलिंगची सुविधा युजर्सना देण्याचा विचार करत आहे. याच फीचर्सची सध्या कंपनीकडून चाचणी सुरू आहे. नवीन अपडेट आल्यानंतर युजर्स थेट फेसबुक अॅपवरून व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग करू शकतील. याचाच अर्थ युजर्सना कॉल करण्यासाठी आता फेसबुक मेसेंजर अॅपवर जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपूर्वी, फेसबुकने त्यांच्या मुख्य अॅपमधून मेसेजिंग आणि कॉलिंग फीचर काढून टाकले आणि मेसेंजर अॅप स्वतंत्रपणे लाँच केले होते. मात्र आता कंपनी फेसबुकच्या मुख्य अॅपमध्ये पुन्हा कॉलिंग सुविधा देणार असून हे अद्याप स्पष्ट नसले तरी नवीन अपडेटमध्ये युजर्सना फक्त कॉलिंग सुविधा उपलब्ध असेल किंवा मेसेजिंग आणि कॉलिंग दोन्ही सुविधा पूर्वीप्रमाणे उपलब्ध असतील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. गेल्याच आठवड्यात फेसबुकने एक नवीन व्हर्च्युअल रिअॅलिटी रिमोट वर्क अॅप लाँच केले ज्यामध्ये युजर्स मिटींगमध्ये स्वतःऐवजी व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी होऊ शकतात. सध्या, फेसबुकच्या या आगामी फिचरची चाचणी केली जात आहे.


 

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -