घरटेक-वेकFacebook profit over safety : मार्क झुकरबर्गने युजर्सच्या सुरक्षेपेक्षा नफेखोरीचा आरोप फेटाळला,...

Facebook profit over safety : मार्क झुकरबर्गने युजर्सच्या सुरक्षेपेक्षा नफेखोरीचा आरोप फेटाळला, म्हणाला…

Subscribe

हाउगन ही फेसबुकमध्ये काम करणारी माजी कर्मचारी आहे

फेसबुक सीईओ मार्क झुकरबर्ग (Facebook CEO Mark Zuckerberg)  यांच्या अडणींमध्ये आणखी वाढ होत आहे. ६ तास फेसबुक ठप्प झाल्यानंतर मार्क झुकरबर्गला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. मात्र आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर मार्क झुकरबर्गवर आरोप करण्यात आले आहे. युझर्सच्या सेफ्टीपेक्षा फेसबुक पैसे कमावण्याकडे सर्वात जास्त लक्ष देते असा आरोप  व्हिस्लब्लोअर फ्रान्सीस हाउगनने फेसबुकवर केला आहे. (Facebook profit over safety)  हाउगन ही फेसबुकमध्ये काम करणारी माजी कर्मचारी आहे. मात्र मार्क झुकरबर्गने आरोपांमध्ये कोणतीही सत्यता नाही असे म्हणत सगळे आरोप फेटाळले आहेत.

यासंदर्भात मार्क झुकरबर्गने फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना एक नोट लिहीत जाणूनबुजूण कोणताही कंटेन्ट पुढे आणत नाही की ज्यामुळे लोक नाराज होतील आणि त्याचा आपल्याला फायदा होईल, या आरोपांमध्ये कोणतीही सत्यता नाही,असे म्हटले आहे.  व्हिसलब्लोअर फ्रान्सीस हाउगनने अमेरिकी सीनेटच्या उप समितीसमोर फेसबुकच्या संदर्भात मोठा खुलासा केल्याने फेसबुकच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

- Advertisement -

कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मवर खासकरुन इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर टीनेज सेफ्टीसाठी, नफा मिळवण्यासाठी विवाद निराकरण सारख्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचप्रमाणे कंपनीने त्यांचा वयक्तिक सर्वे देखील लपवला आहे ज्यात इन्स्टाग्रामचा अल्गोरिदम तरुणांवर नकारात्मक प्रभाव कर असल्याचा खुलासा करण्यात आला आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

हाउगन ही फेसबुकमध्ये काम करणारी माजी कर्मचारी आहे. तिने यूएस सिक्योरिटीज अँड एक्सचेंज कमिशनकडे कंपनीची तक्रार केली होती. ज्यात काही तक्रारी या भारताशी देखील जोडल्या होत्या. हाउगनने तक्रार दाखल करताना काही दस्तावेज देखील सादर केले होते. ज्यात फेसबुकने आरएसएसकडून संचालितसोबत जोडलेले अकाऊंट कशाप्रकारे प्रमोट केले हे सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – WhatsApp down: Facebook डाऊनमुळे झुकरबर्गला ७ अरब डॉलर्सचे नुकसान, श्रीमंतांच्या यादीतूनही नाव घसरले

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -