Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक Facebook च्या ५० टक्के युजर्सचा सर्वाधिक वेळ जातो व्हिडिओ पाहण्यात, फेसबुक सीईओंची...

Facebook च्या ५० टक्के युजर्सचा सर्वाधिक वेळ जातो व्हिडिओ पाहण्यात, फेसबुक सीईओंची माहिती

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियावर युजर्स आपला सर्वाधिक वेळ हा व्हिडिओ पाहण्यासाठी घालवत असल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकनेच जाहीर केली आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग फेसबुकच्या उत्पन्नाविषयी माहिती देताना म्हणाले की, फेसबुकवरील सर्वाधिक युजर्स आपला अर्धा वेळ हा व्हिडिओ पाहण्यात घालवतात. ही संख्या जवळपास ५० टक्के इतकी आहे. यात इन्स्टाग्रामधील गुंतवणूक वाढीमध्ये रील्स फिचर्सचा सर्वात मोठा वाटा आहे. यासदंर्भातील माहिती जाहीर केली असली तरी त्यांनी कोणतीही आकडेवारी सादर केली नाही. मात्र फेसबुक, इंस्टाग्रामची वाढती लोकप्रिय पाहता सोशल मीडियावरील इतर प्रतिस्पर्धी प्लॅटफॉर्मला ठक्कर देत उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्त्न केले जात आहेत. यात एकूणच सर्वाधिक फेसबुक युजर्सला प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ तयार करण्यास किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी उत्तेजित केले जात आहे.

या महिन्याच्या सुरूवातीस झुकरबर्ग यांनी जाहीर केले की, फेसबुक ही सोशल मीडिया कंपनी २०२२ च्या अखेरीस क्रिएटर्समध्ये १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल. ही गुंतवणूक प्लॅटफॉर्मवरील क्रिएटर फंड्स, प्रोग्राम्स फंड्स आणि मॉनिस्टेशन प्रोग्राम्ससाठी वापरली जाणार आहे. तसेच कंपनीने पुढे आपल्या क्रिएटर्स कम्युनिटीला वचन दिले की, ते २०२३ पर्यंत त्यांच्या कमाईत कपात करणार नाही.

- Advertisement -

फेसबुकने चालू वर्षात २९ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली असून ही कमाई गेल्या वर्षीच्या तुलनेत ५६ टक्क्यांहून अधिक आहे. तसेच दर महिन्याला फेसबुकवर जवळपास ३.५ अब्ज युजर्स अँटिव्ह होत आहेत. यात अमेरिकेतील फेसबुक वापरकर्त्यांची संख्या पु्न्हा कमी होत आहे. यात मागील वर्षी भारतासह काही देशांनी टिकटॉक अॅपवर बंदी घालताच फेसबुकने त्याच तोडीचे रील्स फिचर्स लाँच केले. भारतात टिकटॉकवर बंदी घातली असतानाही शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म जगभरात वाढत आहे.

टिकटॉक हे अॅप अलीकडेच जगभरात तीन अब्जाहूनही अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. सेन्सर टॉवरच्या आकडेवारीनुसार, तीन अब्ज इंस्टॉल मार्कला मागे टाकत टिकटॉक हा पाचवा नॉन-गेम अ‍ॅप ठरला आहे. जानेवारी २०१४ पासून तीन अब्जहून अधिक डाउनलोड्सपर्यंत पोहोचलेले अॅप्स म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, मेसेंजर आणि इंस्टाग्राम.

- Advertisement -

झुकरबर्ग यांनी फेसबुकला एका मेटावॅर्स कंपनीत रुपांतरित करण्याच्या आपल्या दृष्टीबद्दल देखील सांगितले, ज्यामुळे लोक एकत्रितपणे व्हर्चुअल स्पेसमध्ये राहू शकतील. यावर बोलताना झुकरबर्ग म्हणाले की “येत्या काही वर्षांत लोक आम्हाला एक मुख्य सोशल मीडिया कंपनीपासून ते मेटावर्स कंपनीत पाहण्यासाठी उत्सुक असतील अशी अपेक्षा करतो. बर्‍याच प्रकारे मेटावॅर्स ही सोशल तंत्रज्ञानाची अंतिम अभिव्यक्ती आहे. अशी माहिती त्यांनी कंपनीच्या तिमाहीच्या उत्पन्नाबद्दल बोलताना दिली.

झुकरबर्ग यांनी विश्लेषकांना सांगितले की, “ मेटावर्सच्या निर्मितीनंतर तुम्ही एखाद्या दुसर्‍या व्यक्तीबरोबर किंवा दुसर्‍या ठिकाणी आहात असा भास होईल. ते म्हणाले, ” क्रिएटिंग अवतार आणि डिजिटल ऑब्जेक्ट्समुळे केंद्रस्थानी येत दुसऱ्यांपेक्षा आपण कसे वेगळे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो.


केंद्राने Covishield आणि Covaxin च्या किंमतीत केली वाढ, जाणून घ्या नवे दर


 

- Advertisement -