WhatsApp down: Facebook डाऊनमुळे झुकरबर्गला ७ अरब डॉलर्सचे नुकसान, श्रीमंतांच्या यादीतूनही नाव घसरले

मार्क झुकरबर्गच्या शेअर्सची किंमत एका दिवसात ५ टक्क्यांनी खाली आली

facebook ceo Zuckerberg loses 7 billion dollar drop down due to Facebook down
WhatsApp down: Facebook डाऊनमुळे झुकरबर्गला ७ अरब डॉलर्सचे नुकसान, श्रीमंतांच्या यादीतूनही नाव घसरले

सोमवारी रात्री अचानक व्हॉट्स अ‍ॅप,फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक डाऊन झाल्याने युझर्सची तारांबळ उडाली. मंगळवारी पहाटे पासून सर्व सेवा पूर्वपदावर आल्या. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा ग्लोबल आउटेज म्हणजेच जागतिक स्तरावर खळबळ उडवून देणारी घटना असल्याचे मानले जात आहे. सेवा डाऊन होण्यामागचे कारण मात्र अद्याप कंपनीकडून सांगण्यात आलेले नाही. फेसबुक,व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम डाऊन झाल्यानंतर फेसबुकचे साईओ मार्क झुकरबर्गचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या संपत्तीत सहा तासात ७ अरब डॉलर्सचे नुकसान झाले असून श्रीमंतांच्या यादीतून मार्क झुकरबर्गचे नाव घसरले आहे. (facebook ceo Zuckerberg loses 7 billion dollar drop down due to Facebook down)  मार्क झुकरबर्गची संपत्ती दर तासाला ११६.६६ करोड डॉलरने खाली आली आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारातही फेसबुकच्या शेअर्सची विक्री सुरू झाली आहे. तर एका दिवसात शेअर्सची किंमत ५ टक्क्यांनी घसरली आहे.

Bloomberg बिलिनेयर इंडेक्सच्या माहितीनुसार, मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत घट होऊन १२०.९ अरब डॉलर झाली आहे. मार्क झुकरबर्गचे नाव बिल गेस्टपेक्षा खाली पाचव्या क्रमांकावर गेले आहे. आधी मार्क झुकरबर्ग या यादीत चौथ्या क्रमांकावर होता. याआधी १३ सप्टेंबर रोजी मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत १९ अरब डॉलरची घट झाली होती.

तब्बल ६-७ तासांनी फेसबुक,व्हॉट्स अ‍ॅप आणि इन्स्टाग्राम सेवा पूर्वपदावर आल्यानंतर मार्क झुकरबर्ग यांनी ट्विट करत युझर्सची माफी मागितली. ‘फेसबुक,व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम सेवा पुन्हा ऑनलाईन आल्या आहेत. सेवा ठप्प झाल्याने युझर्सना आलेल्या अडथळ्यासाठी सॉरी. तुम्ही ज्या लोकांची काळजी करता त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तुम्ही आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात याची आज आम्हाला पुन्हा जाणीव झाली’,असे मार्क झुकरबर्गने म्हटले आहे.

‘या’ कारणांमुळे झाले Facebook,What’s App डाऊन

व्हॉट्स अ‍ॅप,फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक डाऊन होण्याचे कारण अद्यार समोर आलेले नाही मात्र परंतु सेवा डाऊन होण्यामागे डोमेन नेम सिस्टम म्हणजेच DNS असल्याचे सांगण्यात येत आहे. DNSला इंटरनेटचे फोनबुक देखील म्हटले जाते. जेव्हा युझर्स कोणतेही होस्ट नेम URL मध्ये टाईप करतो जसे की facebook.com तेव्हा DNS IP अड्रेसमध्ये बदलला जातो.

त्याचप्रमाणे BGP (Border Gateway Protocol) हे देखील सेवा डाऊन होण्यामागचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. BGP मध्ये IP अड्रेस आणि DNS नेमर्सचा मार्ग असतो. DNS जर इंटरनेटचे फोनबुक आहे तर BGP त्याची नेव्हिगेशन सिस्टीम आहे. BGP ठरवते की कोणत्या मार्गाने डेटा जलद गतीने पाठवता येईल. DNS रेज्युरेशन फेल्युअरमुळे फेसबुक युझर्स एक्सेस करू शकत नव्हते.

इंटरनेट इफ्रास्ट्रक्चर कंपनी Cloufflare चे CTO John Graham-Cummingयांच्या माहितीनुसार, फेसबुकने त्याच्या राऊटर्समध्ये काही तरी केले ज्यामुळे फेसबुकचे नेटवर्क इतर इंटरनेट सोबत कनेक्ट होऊ शकत नव्हते. मात्र जोवर कंपनीकडून कोणतेही स्टेटमेंट येत नाही तोवर कोणतेही निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे युझर्सचे म्हणणे आहे.


हेही वाचा – तब्बल ७ तासांनी What’s App,Facebook,Instagram सेवा पूर्ववत