फेसबुक मेसेंजर रूम्स लाँच; आता एकाचवेळी ५० जणांना करता येणार व्हिडिओ कॉल

फेसबुक मेसेंजर रूम फीचरच्या मदतीने वापरकर्ते एकाचवेळी व्हिडिओ कॉलमध्ये ५० जणांना कनेक्ट करु शकातात.

Facebook Messenger Rooms

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या मेसेंजर अॅपमध्ये एक खास फिचर आणलं आहे जे लॉकडाऊन दरम्यान वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरू शकतं. कंपनीने फेसबुक मेसेंजर रूम्स (Facebook Messenger Rooms) फिचर जाहीर केलं आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी एका व्हिडिओ कॉलमध्ये ५० लोक एकाच वेळी कनेक्ट होऊ शकतात. यासाठी, वापरकर्त्यांना चॅट रूम तयार करावी लागेल आणि होस्ट करणाऱ्याला यावर नियंत्रण करता येणार आहे.

कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टवर फेसबुक मेसेंजर रूम्सची (Facebook Messenger Rooms) माहिती दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक मेसेंजर रूम फीचरच्या मदतीने वापरकर्ते एकाचवेळी व्हिडिओ कॉलमध्ये ५० जणांना कनेक्ट करु शकातात. व्हिडिओ कॉलशिवाय, बातम्या किंवा इव्हेंटशी संबंधित माहिती देखील शेअर करता येणार आहे.


हेही वाचा – एअरटेलच्या या रिचार्ज पॅकसह मिळणार Disney+ Hotstar VIP चं सबस्क्रिप्शन मोफत


या व्यतिरिक्त कंपनीचे म्हणणे आहे की मेसेंजर रूम किती वेळ सुरू असेल यावर मर्यादा नाहीत. म्हणजेच, वापरकर्ते त्यावर अमर्यादित व्हिडिओ कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात. मॅसेंजर रूम्स हे होस्ट करीत असलेल्या वापरकर्त्याद्वारे नियंत्रित होतील. होस्ट मेसेंजर रूम्सला त्याच्या स्वत: च्या मर्जीनुसार लॉक किंवा अनलॉक करू शकतो.