घरटेक-वेकआता FB वर मिळणार Tiktok व्हिडिओचा आनंद; Facebook Reels फीचर लाँच

आता FB वर मिळणार Tiktok व्हिडिओचा आनंद; Facebook Reels फीचर लाँच

Subscribe

सध्या सोशल मीडियाचं व्यसन सगळ्यांनाच लागलं असताना फेसबुक, टिकटॉक, व्हॉट्सअप सारखे अॅप चांगलेच चर्चेत आहे. मात्र आता नेटकऱ्यांसह युजर्सना फेसबुककडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे. आता फेसबुक युजर्सना टिकटॉक सारख्या शॉर्ट व्हिडिओचा आनंद फेसबुकवरच घेता येणार आहे. जगातील सर्वात मोठी असणारी सोशल मीडिया वेबसाईट फेसबुकने आपलं फेसबुक रील्स हे फीचर नुकतंच ऑफिशिअल लाँच केलं आहे. यासह फेसबुकने असेही सांगितले की, इंस्टाग्राम युजर्सना त्यांनी तयार केलेले व्हिडिओ रिल्स थेट फेसबुकवर शेअर करण्याची सुविधा मिळणार आहे.

असं आहे फेसबुक रिल्सचं नवं फिचर

फेसबुकने टिकटॉकसारख्या लहान-लहान व्हिडिओना रिल्स असं नाव दिलं आहे. फेसबुकवरील हे रिल्स अगदी इंस्टाग्राम रिल्स सारखेच आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्स काही सेकंदाचे व्हिडिओ तयार करून शेअर करू शकतात. हे नवं फीचर न्यूज फीडमध्ये युजर्सना बघता येणार आहे. युजर्सना फेसबुकने तयाक केलेल्या म्युझिक लायब्ररीतून एखादं साँग सिलेक्ट करून लहान व्हिडिओ तयार करता येणार आहे. यासह वेगवेगळे इफेक्ट सिलेक्ट करून हवा तसा स्पीड आणि वेळ युजर्सना ठरवता येणार आहे.

- Advertisement -

सध्या कंपनीने फेसबुक आणि इंस्टाग्राम रील्स वेगवेगळे ठेवल्याचे दिसत आहे. युजर्सना फेसबुक रील्स केवळ फेसबुक न्यूज फीडवर शेअर करता येतील असा पर्याय देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इन्स्टाग्राम रील्सही त्याच अ‍ॅपवर शेअर करता येणार आहे. हे फीचर सर्व युजर्ससाठी केव्हा उपलब्ध होणार याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे युजर्समध्ये या नव्या फीचरची चांगलीच उत्सुकता आहे. या नव्या फीचरच्या माध्यमातून फेसबुक टिकटॉकने सुरू केलेल्या भारतातील शॉर्ट व्हिडिओचे क्रेझ वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतात टिकटॉक बंदी होताच कंपनीने इन्स्टाग्राम रील्स सुरू केलं होचं. भारतात युजर्सना रील्स नावाचा वेगळा टॅब मिळतो. याची सुरूवात भारतात झाली. तसेच इंस्टाग्राम लाइट अ‍ॅपवरही हे फीचर प्रथमच भारतीय युजर्ससाठी देण्यात आले आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -