घरटेक-वेक'Facebook' चा नवा लोगो लॉन्च

‘Facebook’ चा नवा लोगो लॉन्च

Subscribe

विशेष म्हणजे हा नवा लोगो GIF स्वरूपात केला प्रसिद्ध

सोशल मीडियातील फेसबुक या अॅप्लिकेशनचा नुकताच नवा लोगो लॉन्च झाला आहे. कंपनीने हा लोगो एका खास उद्देशाने तयार केला आहे. या नव्या लोगोमध्ये सर्व इंग्लिश अक्षरं ही कॅपिटलमध्ये आहेत. मात्र हा बदललेला लोगो तुम्हाला फेसबुक अॅप किंवा फेसबुक वेबवर दिसणार नाही. व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामची पॅरेंट कंपनी म्हणून हा स्वतः चा नवा लोगो प्रसिद्ध केला असून कंपनीचा हा लोगो फेसबुक अ‍ॅपच्या लोगोपेक्षा वेगळा दिसणार आहे. सिलिकॉन वॅली कंपनीसाठी हा नवा लोगो डिजाइन करण्यात आला आहे.

- Advertisement -

फेसबुकच्या अंतर्गत फेसबुक अॅप, मॅसेंजर, इन्स्टाग्राम, व्हाट्सअॅप, ओकुलस, वर्कप्लेस, पोर्टल आणि कॅलिब्रा यांचा समावेश होतो. तसेत त्याची मालकी देखील फेसबुककडे आहे. विशेष म्हणजे हा नवा लोगो GIF स्वरूपात प्रसिद्ध केला आहे. हा लोगो वेगवेगळ्या रंगात असून फेसबूकची इतर प्रोडक्टला दर्शवतो.

फेसबुकच्या माध्यमातून वेगळी ओळख

यातील निळा रंग हा फेसबुकसाठी, हिरवा व्हॉट्सअ‍ॅपसाठी आणि गुलाबी रंग इन्स्टाग्रामसाठी देण्यात आला आहे. एका अहवालानुसार हा फेसबुकचा नवा लोगो काही आठवड्यातच युजर्सना बघायला मिळणार आहे. यासह हा नवा लोगो कंपनीला फेसबुक अॅपच्या माध्यमातून वेगळी ओळख देईल, असेही सांगितले जात आहे.

- Advertisement -

लोगो बदलण्यामागचा उद्देश

‘हा नवा लोगो खास ब्रँडिंगसाठी बनवला गेला असून लोगोच्या व्हिजवल अॅपपेक्षा वेगळा दिसावं याकरिता या नव्या लोगोची कस्टम टायपोग्राफी वापरण्यात आली आहे. नवीन कंपनीचा लोगो सादर करीत आहोत आणि पुढे फेसबुक कंपनीला फेसबुक अ‍ॅप मधून वेगळे करत आहोत, जे त्याचे ब्रँडिंग कायम ठेवेल. तसेच लोगो बदलण्यामागे हा एकच उद्देश आहे की, यापुढे युजर्सना माहित असावे ते नेमके कोणत्या कंपनीची सेवा वापरत आहे.’, असे फेसबुकचे मुख्य विपणन अधिकारी एंटोनियो लुसियो यांनी सांगितले.


फेसबुकवर नवं फिचर; वाचता येणार बातम्या
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -