Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर टेक-वेक Flipkartवर कॅश ऑन डिलिव्हरी सोबतच QR पेमेंटची सुविधा

Flipkartवर कॅश ऑन डिलिव्हरी सोबतच QR पेमेंटची सुविधा

कॅश ऑन डिलिव्हरी ग्राहकांसाठी आणखी सोपी होणार आहे. कॅश ऑन डिलिव्हरीसोबतच QR Code Scan पेमेंट हा पर्याय आता Flipcart ने ग्राहकांना दिला आहे.

Related Story

- Advertisement -

ई कॉमर्स वेबसाईट्सपैकी फ्लिपकार्टला (Flipkart) ग्राहकांची मोठी पसंती असते. आपण पाहिले तर  यूपीआय (UPI) आधारित पेमेंट्समध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. Flipcartवर डिलिव्हरी घेण्यासाठी कॅश ऑन  डिलिव्हरीचा पर्यायही देण्यात येतो. मात्र आता फ्लिपकार्टने कॅश ऑन डिलिव्हरी पेमेंटसाठी क्यू आर कोड पेमेंटची (QR Code payment)  सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे कॅश ऑन डिलिव्हरी ग्राहकांसाठी आणखी सोपी होणार आहे. कॅश ऑन डिलिव्हरीसोबतच QR Code Scan पेमेंट हा पर्याय आता Flipcart ने ग्राहकांना दिला आहे. (Facility of QR payment along with cash on delivery on Flipkart)

ई कॉमर्स बाजारपेठांमध्ये आणि फिनटेक यांच्यात फरक आहे. त्यामुळे ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन आणि त्यांच्या अँटिट्यूडनुसार, त्यांना पर्याय उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे महामारिच्या काळात ग्राहकांनी ऑनलाई शॉपिंगला सर्वात जास्त महत्त्व दिले आहे. सर्वाधिक ग्राहक पे ऑन डिलिव्हरी किंवा कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडत आहेत. वस्तू घेतल्यानंतर पैशांच्या बाबतीत कोणतीही शंका राहू नये त्याचप्रमाणे ग्राहकांना पेमेंट केल्यानंतर मन:शांती लाभेल याची खातरजमा आम्ही करत आहोत,असे फ्लिपकार्ट फिनटेक अँड पेमेंट्स विभागाचे प्रमुख रंजित बोयनपल्ली यांनी म्हटेल आहे.

- Advertisement -

QRपेमेंटच्या वापरामुळे डिजिटल पेंमेंट्समध्ये वाढ होणार आहे. डिजिटल पेमेंटच्या पर्यायामुळे नव्याने इंटरनेटचा वापर करणाऱ्या ग्राहकांना सक्षम करुन २०० दशलक्ष ग्राहकांना डिजिटल प्लॅटफॉर्म आणणे सोपे होणार आहे. कोरोनाच्या काळात सध्या ग्राहक ई कॉमर्स वेब साईट्सवर वस्तू खरेदी करण्याला सर्वाधित प्राधान्य देत आहेत. त्याचप्रमाणे कोरोना काळात यूपीआय पेमेंटचा वापर वाढला आहे. एप्रिल महिन्यात २.६४ अब्ज यूपीआय पेमेंटची नोंद करण्यात आली आहे. तर NCIने दिलेल्या माहितीनुसार, मागील एका वर्षांत यूपीआय पेमेंटमध्ये १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. फ्लिपकार्टच्या नव्या पेमेंट सुविधेमुळे ग्राहकांचा डिजिटल पेमेंटवरील विश्वास वाढणार आहे.


हेही वाचा – दहा हजार फॉलोअर्स असणाऱ्या युझर्ससाठी Twitter लाँच करणार सुपर फॉलोअर्स टूल

- Advertisement -