घरटेक-वेक'क्यूआर कोड'ने व्यवहार करताय सावधान! बँक खाते होईल रिकामे!

‘क्यूआर कोड’ने व्यवहार करताय सावधान! बँक खाते होईल रिकामे!

Subscribe

अज्ञात क्यूआर कोडवर किंवा फोनवर आलेल्या क्यूआर कोडवर स्कॅन करु नका

जलद आणि सोप्पा पर्याय म्हणून अनेक जण आता ‘क्यूआर कोड’ व्यवहाराला पसंती देतात. पानवाल्यापासून ते अगदी ५ स्टार हॉटेलमध्ये ग्राहक क्यूआर कोड स्कॅन करुन पेमेंट करतात. मात्र हा ऑनलाइन क्यूआर कोड व्यवहार ग्राहकांना कधी कधी चांगलाच महागात पडतो. यावर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्वसामान्य नागरिकांनी ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी अज्ञात क्यूआर कोडवर किंवा फोनवर आलेल्या क्यूआर कोडवर स्कॅन करु नका असा इशारा दिला आहे. त्यामुळे तुमचे बँक खाते काही क्षणात रिकामी होऊ शकते. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘सायबर दोस्त’ या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन नागरिकांना सावध करण्यात आले आहे. (Fake QR code alert by cyber dost).

नेमका क्यू कोड असतो कसा

क्यूआर कोड म्हणजे quick response code. आजच्या डिजीटल जगतात आपल्याला सर्व कामे ऑनलाईन करण्याची सवय झाली आहे. तर क्यूआर कोड देखील ऑनलाईन माहिती देण्याचा किंवा ऑनलाईन पेमेंट करण्याचे एक माध्यम आहे. हा क्यूआर कोड चिन्हांच्या स्वरुपात असतो त्यामुळे तो आपण वाचू शकत नाही. मात्र स्कॅनर डिव्हाईसच्या मदतीने तो स्कॅन करुन त्यातील माहिती किंवा पेमेंट मिळवता येतो. या क्यूआर कोडचा वापर आधी फक्त ऑटोमोटिव्ह उद्योगात होत होता. मात्र आता प्रत्येक वस्तूवर किंवा एखाद्या चहाच्या टपरीवर पैसे देण्यासाठी क्यूआर कोड असतो. मात्र यातून अनेकदा फसवणुकीच्या घटना देखील घडत आहेत. यासाठी तुम्ही आधार कार्डचे उदाहरण घेऊ शकता. आधारशी संबंधित QR कोड टेंपर-प्रूफ आहे. कारण त्याला यूआयडीएआय द्वारे डिजिटल मान्यता मिळाली आहे.

- Advertisement -

आधारकार्डवरचा क्यूआर कोड

केंद्र सरकारने भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणून आधार कार्डला मान्यता दिली आहे. या आधारकार्डवरही क्यूआर कोडची सुविधा दिली आहे. या आधारच्या कोडमध्ये संदर्भ कोड, आधार कार्ड धारकाचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल, घरचा पत्ता, छायाचित्र आणि डिजिटल स्वाक्षरी दिसते. हा क्यूआर कोड हँडहेल्ड स्कॅनर डिव्हाईस, अँड्रॉइड आधारित अॅप आणि आयओएस आधारित अॅपमधून स्कॅन केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे दररोज वापरातील उत्पादनांवरही हल्ली क्यूआर कोडची सुविधा दिली जाते. त्यातून त्या उत्पादनाविषयी सर्व माहिती मिळू शकते. क्यूआर कोड मोबाईल पेमेंट्स ऑफ पॉईंट ऑफ सेल (पीओएस) साठी देखील वापरले जातात. कोरोना काळात क्यूआर कोर्ड पेमेंटमध्ये झपाट्याने वाढ झाली. दुधाची खरेदी करण्यापासून रेशनिंगपर्यंत आणि ऑटोचे भाडे देण्यापर्यंत लोक क्यूआर कोड स्कॅन वापरत

मोबाईल वॉलेट पेमेंट

सध्या मोबाईल वॉलेट किंवा मोबाईल बँकिंग पेमेंटचा वापर अधिक होत आहे. अनेक बँक ग्राहकांना अॅप स्कॅनरची सुविधाही देत आहे. भारतात अनेक कंपन्या सध्या मोबाईल वॉलेट पेमेंटचा पर्याय देत आहेत. म्हणजे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर एखाद्या वस्तूचे किंवा कसेही बिल तुम्ही डायरेक्ट वॉलेट किंवा बँक अ‍ॅपमधून वॉलेट किंवा बँक अ‍ॅपमधून पैसे वजा केले जातात. त्यामुळे रोखीने व्यवहार करण्यापासून मुक्तता होते. म्हणजेच आपला मोबाईल, बँक आणि रोख पैसे अशी दोन्ही प्रकारची काम करतो. परंतु प्रश्न असा आहे की, क्यूआर कोड स्कॅन करणे किती सुरक्षित आहे? सरकार किंवा रिझर्व्ह बँकेने पुरविलेल्या सेवांमध्ये क्यूआर कोड वापरण्यात काहीच अडचण नाही, परंतु आजकाल फसवणूक होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. म्हणूनच, गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, अज्ञात क्यूआर कोड स्कॅन करू नये, अन्यथा आपले खाते पूर्णपणे रिकामे देखील केले जाऊ शकते.

- Advertisement -

 

क्यूआर कोडद्वारे फसवणूक

सध्या ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच सायबर क्राईम करणारे चोर मोबाईलवर मेसेजेसद्वारे क्यूआर कोड पाठवून किंवा आपल्या संगणकावर असे मेसेज पाठवून फसवणूक करतात. असे अज्ञात क्यूआर कोड स्कॅन केल्यामुळे बँक खात्यातील रक्कम गेल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे हा डिजिटल फसवणूकीचे एक नवीन प्रकार समोर येत आहे. त्यामुळे सरकारने हे टाळण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. क्यूआरबद्दल पूर्ण माहिती उपलब्ध होईपर्यंत पीओएस विश्वसनीय असंल्यासच पीओएस स्कॅन केले पाहिजेत, हे सरकारने स्पष्ट केले आहे. अन्यथा, बँक खाते रिकामे होण्याचा धोका वाढू शकतो.

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -