घरटेक-वेकपाहा मंगळावर काढलेला पहिला 'सेल्फी'

पाहा मंगळावर काढलेला पहिला ‘सेल्फी’

Subscribe

मंगळग्रहाच्या अभ्यासाला नुकतीच सुरुवात झाली असून पुढील काळात मंगळाची अधिक माहिती आपल्याला मिळू शकणार आहे. मंगळावर आणखी काय काय आहे?, मंगळावर जीवसृष्टी आहे का? या सगळ्याचा अभ्यास होणार आहे.

सध्या नासा मंगळ मोहिमेत व्यग्र आहे. मंगळ ग्रहाच्या अंतर्गत भागाचा अभ्यास करणारे त्यांचे इनसाईट हे यान मंगळग्रहावर उतरले आहे. या आधी या यानाने मंगळग्रहावरील वाहणाऱ्या वाऱ्यांचा आवाज पृथ्वीवर पाठवता होता आणि आता एक पाऊल पुढे जात या यानाने मंगळावरचा सेल्फी पाठवला आहे. या यानासोबत पाठवण्यात आलेल्या रोबोटिक आर्मने हा सेल्फी टिपला असून नासाने हा फोटो ट्विट करत जगाला ही माहिती दिली आहे.

ऐका ‘मंगळा’वरील आवाज

असा आहे ‘सेल्फी’

हा फोटो या मंगळावरुन पाठवण्यात आलेला आहे. नासाचे हे यान भारतीय वेळेनुसार २७ नोव्हेंबरला मंगळावर उतरले. त्यानंतर हा सेल्फी काढण्यात आलेला आहे. यानाला इन्स्ट्रुमेंट कॅमेरा लावण्यात आलेला आहे. लँडर समोरील मंगळाचा भाग या कॅमेरामध्ये कैद झालेला आहे. या फोटोवरुन पृथ्वीवरील लोकांना मंगळ कसा असेल याचा अंदाज येऊ शकेल. नासा या संदर्भातील अधिक माहिती लवकरच देणार असल्याचे नासाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हे माहित आहे का? ‘यांना’ मिळणार चंद्रावर उतरण्याची संधी

उलगडणार मंगळ ग्रह

मंगळग्रहाच्या अभ्यासाला नुकतीच सुरुवात झाली असून पुढील काळात मंगळाची अधिक माहिती आपल्याला मिळू शकणार आहे. मंगळावर आणखी काय काय आहे?, मंगळावर जीवसृष्टी आहे का? या सगळ्याचा अभ्यास होणार आहे. सध्या फक्त रोबोटिक आर्म या मोहिमेसाठी पाठवण्यात आला आहे. पण पुढील काळात मानव मंगळावर उतरवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. जेणेकरुन एक वेगळा इतिहास रचला जाईल आणि पृथ्वीपासून लांब असलेल्या या ग्रहांची अधिक माहिती मिळू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -