Flipkart-Urbanic: सणासुदीनिमित्त लाखो ग्राहकांपर्यंत जागतिक फॅशन पोहोचण्यासाठी फ्लिपकार्टने केली भागीदारी

Flipkart partners with London-based fashion brand Urbanic
Flipkart-Urbanic: सणासुदीनिमित्त लाखो ग्राहकांपर्यंत जागतिक फॅशन पोहोचण्यासाठी फ्लिपकार्टने केली भागीदारी

या सणासुदीच्या काळात, भारतातील युवा ग्राहकांना बहुप्रतिक्षित अशी जागतिक फॅशनची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देण्यासाठी, फ्लिपकार्टने (Flipkart) ‘अर्बनिक’ या लंडन स्थित जेन – झेड फॅशन ब्रँडसोबत (London-based fashion brand Urbanic) भागीदारी जाहीर केली आहे. या माध्यमातून, महानगरांतील तसेच टियर २ आणि टियर ३ शहरांमधील फ्लिपकार्टच्या सतत वाढणाऱ्या आणि आतापर्यंत ३५० दशलक्ष पेक्षा जास्त असणाऱ्या ग्राहकांसाठी या ब्रँडच्या १००० अनोख्या शैलीतील श्रेणी उपलब्ध असणार आहे. या हंगामात अनेक आकर्षक ब्रँड फ्लिपकार्टवर दाखल होणार असून त्यातील ती पहिलीच भागीदारी आहे. खासकरून स्टायलिश फॅशनची आवड असणाऱ्या युवा पिढीसाठी ही भागीदारी फारच महत्वपूर्ण असेल. (Flipkart partners with London-based fashion brand Urbanic)

गावागावात अर्बनिक फॅशन पोहोचण्यास आता मदत होणार

या भागीदारीमुळे शहरातील आणि गावागावातील फ्लिपकार्टच्या खरेदीदारांच्या मोठ्या वर्गापर्यंत अर्बनिकची फॅशन पोहोचण्यास मदत होईल. आपल्या फॅशन विभागाचा सातत्याने विस्तार करणे आणि देशभरातील नवनवीन फॅशन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन फॅशन उपलब्ध करून देण्याच्या फ्लिपकार्टच्या उद्देशाना अनुसरूनच ही फॅशन दाखल होत आहे. त्यामुळे विविध श्रेणीतील पोशाख आणि लाउंजवियरची निवड ग्राहकांना करता येणार आहे. त्यांची किमत २९९ पासून पुढे सुरू असून त्यामध्ये अर्बनिकचे टॉप्स, डेनिम्स, हिवाळी पोशाख, अंतर्वस्त्रे आणि पोहण्याची कपडे यांचा समावेश आहे. आजपासून ती फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टसोबतच्या अर्बनिकच्या या भागीदारीतून भारतातील अधिकाधिक खरेदीदार जोडले जाणार आहेत.

यासंदर्भात बोलताना, फ्लिपकार्ट फॅशनचे उपाध्यक्ष निशित गर्ग यांनी सांगितले कि, “सणासुदीच्या काळात फ्लिपकार्टसोबत नवीन ग्राहक जोड़ण्यासाठी फॅशन हा महत्वाचा घटक आहे आणि या नव्या फॅशनच्या अनावरणामुळे आमच्या जेन – झेड ग्राहकवर्गात मोठ्याप्रमाणात विस्तार होईल असा आमचा विश्वास आहे. या गेल्या वर्षात विविध मार्गानी फॅशनची गरज वाढली आहे आणि आम्ही या बहुप्रतिक्षित हंगामाची तयारी करत असताना जागतिक शैलींचा मोठा प्रभाव राहणार आहे. फ्लिपकार्टवर अर्बनिक दाखल होत असल्याची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत असून या वर्षातील आमची ही सर्वात मोठी फॅशनमधील भागीदारी आहे. देशातील प्रत्येक इच्छुक ग्राहकाला आधुनिक स्टाईल उपलब्ध होईल, असा आमचा विश्वास आहे.”

त्यांनी पुढे असेही सांगितले कि, “फॅशन ट्रेंडना समान स्तरावर आणण्याची आणि महानगरे व टियर २+ प्रदेशातील ग्राहकांमधील दरी कमी करण्याची आमची भूमिका कायम आहे. या दृष्टीने टाकलेले आणखी एक पाऊल म्हणजेच नुकतेच दाखल केलेले ‘ट्रेंड स्टॉप’ हे अँप. यामधून ५५ हजार पेक्षा जास्त आधुनिक युवा शैलीतील छोटया ब्रॅण्डसोबत भागीदारी केली असून त्याला मोठे यश मिळाले आहे. आमच्या युवा फॅशन विभागाच्या विस्तारासाठी या उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कंपन्यांसोबत आम्ही भागीदारी करीत राहणार आहोत. त्याच उद्देशाने अर्बनिक सोबतची ही भागीदारी आहे.”

फ्लिपकार्टसोबतच्या या भागीदारीसंर्दभात आपले मत मांडताना, अर्बनिकच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख, राहुल दायमा यांनी सांगितले कि, ” फ्लिपकार्टसोबत सहयोगी होण्यासाठी आणि त्याद्वारे अर्बनिकचे आकर्षक, उठावदार आणि प्रचलित फॅशन कलेक्शन भारताच्या सर्वात मोठ्या शॉपिंग साईटवर आणण्यासाठी ही एक मोठी संधी आहे. या भागीदारीतून आमची पोहोच तसेच फ्लिपकार्टची पोहोच देशात सर्वत्र वाढवण्याचा आमचा उद्देश आहे. तसेच आमच्या या स्टाईल ब्रँडच्या समुदायाला त्यांचे तंत्रज्ञान उत्कृष्ट डिजिटल शॉपिंग अनुभव उपलब्ध करून देईल.”

अर्बनिक, लंडन कंपनीचे भागीदार जेम्स वेलवूड यानी सांगितले कि, “अर्बनिकने उपलब्ध केलेल्या परवडणाऱ्या किमंतीतील फॅशनेबल व ट्रेंडी पोशाखासाठी सर्व खरेदीदारांसाठी समान संधी उपलब्ध असेल, याची आम्हाला खात्री करायची आहे.”

आज भारतातील युवा फॅशनची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि ही गरज पूर्ण करण्याची मोठी संधी ओळखून, फ्लिपकार्ट या भारतातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स वेबसाईटने आपल्या युवा फॅशन विभागाचा विस्तार सुरु केला आहे. दुहेरी भागीदारी धोरणाद्वारे ते केले जात आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात, संपूर्ण भारतातील ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुक असणाऱ्या (आंतरराष्ट्रीय व स्वदेशी) युवा केंद्रित ब्रँडसोबत ही भागीदारी असेल. त्या अनुषंगाने, फ्लिपकार्टने अर्बनिक या लंडनस्थित जेन-झेडच्या फॅशन ब्रँडसोबत भागीदारी आज जाहीर केली आहे. तर फ्लिपकार्टच्या युवा फॅशन-केंद्रित धोरणाचा दुसऱ्या टप्प्यात, स्वदेशी छोट्या ब्रॅण्डसोबत सहयोग करण्याचे धोरण आहे.

ब्रायन अँड कंपनीच्या How India Shops Online 2.0 या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, नवीन खरेदीदारांसाठी फॅशन ही एक महत्वाची श्रेणी आहे.


हेही वाचा – Ola Electric Scooter: आजपासून खरेदी सुरू; जाणून घ्या बुकिंगसह, किंमत आणि फिचर्स