घरटेक-वेकFlipkart ने ग्लोबल इन्वेस्टर्सकडून जमा केले २६,८०५ करोड रुपये

Flipkart ने ग्लोबल इन्वेस्टर्सकडून जमा केले २६,८०५ करोड रुपये

Subscribe

गेल्या वर्षी जुलै महिन्यात फ्लिपकार्टने १.२ अब्ज डॉलर अपल्या मॅच्युरिटी शेअर होल्डर वॉलमार्टद्वारे उभे केले होते.

फ्लिपकार्टने GIC, कॅनडा पेंशन योजना गुंतवणूक मंडळ (CPP Investment), सॉफ्टबँक व्हिजन फंड-२ आणि वॉलमार्ट यांच्या नेतृत्वात ३.६ अरब डॉलर म्हणजेच २६,८०५ करोड रुपये जमा केले आहेत. (Flipkart raised Rs 26,805 crore from global investors)  या निधीनंतर Flipcart कंपनीचे मूल्यांकन वाढून ३७.६ अब्ज अमेरिकी डॉलर झाले आहे. झपाट्याने वाढणाऱ्या भारतीय ई कॉमर्स बाजारात अँमेझॉन, रिलायन्स जियोमार्ट आणि इतर कंपन्यांसोबत स्पर्धा करत आहे. कर्मचारी, तंत्रज्ञान, पुरवठा साखळी आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे सुरु ठेवू असे फ्लिपकार्टने म्हटले आहे. निधी मिळवण्यासाठी सॉवरेन फंड डिस्रप्टएड, कतर इनव्हेस्टमेंट अँथोरिटी, खजाना नॅशनल बेरहड यांच्यासोबत माक्री मार्की इनव्हेस्टर्स टेनसेंट, विलुहबी कॅपिटल, अंतरा कॅपिटल,फ्रॅक्लिन टेम्पलटन आणि टायगर ग्लोबलसोबत भागीदारी केली आहे.

फ्लिपकार्टने त्यांच्या निवेदनात असे म्हटले आहे की, कंपनी मूल्य ३७.६ अब्ज डॉलर पर्यंत आले आहे. अग्रगण्य जागतिक गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक भारतातील डिजिटल कॉमर्सच्या संभावना आणि हित धारकांसाठी ही क्षमता अधिक स्तरावर वाढवण्याची क्षमता फ्लिपकार्टमध्ये आहे,असे फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमृर्ती यांनी असे म्हटले आहे. फ्लिपकार्ट लवकरच नवीन क्षेणीत गुंतवणूक सुरु ठेवून ग्राहकांचे अनुभव आणि जागतिक स्तरावरील पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी भारतात तयार झालेल्या तंत्रज्ञाचा कंपनी नेहमीच फायदा घेईल,असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी जुलै महिन्यात फ्लिपकार्टने १.२ अब्ज डॉलर अपल्या मॅच्युरिटी शेअर होल्डर वॉलमार्टद्वारे उभे केले होते. तेव्हा कंपनीचे मूल्यांकन २४.९ अब्ज डॉलर झाले होते. तर २०१८मध्ये वॉलमार्ट इंकने फ्लिपकार्ट ग्रुपमध्ये ७७ टक्के वाटा खरेदी करण्यासाठी १६ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. फ्लिपकार्टची सुरुवात २००७मध्ये झाली. फ्लिपकार्ट ग्रुपमध्ये फ्लिपकार्ट, फॅशन साइट मिंट्रा आणि लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन यूनिट ईकार्ट यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोन पे मध्ये फ्लिपकार्ट चा मॅच्युरिटी हिस्सा आहे.


हेही वाचा – Window 11 युजर्ससाठी GoodNews! आता अँड्रॉइड आणि ios प्रमाणे दरवर्षी मिळणार नवे अपडेट फिचर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -