Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक फ्लिपकार्टच्या 'शॉप्सी'ची विक्रेत्यांसाठी झिरो कमिशन सुविधा

फ्लिपकार्टच्या ‘शॉप्सी’ची विक्रेत्यांसाठी झिरो कमिशन सुविधा

Related Story

- Advertisement -

फ्लिपकार्टच्या नव्याने दाखल झालेल्या ‘शॉप्सी’ उपक्रमाने झिरो कमिशन सुविधेची घोषणा आज केली. या उपक्रमातून फँशन, किराणा आणि गृहपयोगी सामग्री प्रवर्गातील विक्रेत्यांना ऑनलाईन संघटित होण्यास मदत मिळणार आहे. त्यातून डिजिटल रिटेल सुविधा न पोहचलेल्या टायर-२ दर्जाच्या लहान शहरांमध्ये आणि गावांमध्ये विविध उत्पादने आणि त्यांची सूची यांचा पुरवठा उपलब्ध होणार आहे.

फ्लिपकार्टचे ७० टक्के ग्राहक टायर-२ आणि टायर-३ दर्जाच्या शहरातील आहेत. शॉप्सीच्या माध्यमातून ही ग्राहकसंख्या ९० टक्क्यांवर नेण्याचे फ्लिपकार्टचे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी सोशल व्यापार सुविधेसोबतच आकर्षक प्रोत्साहनपर योजना राबविण्यावर फ्लिपकार्टचा भर आहे. त्यासाठी शॉप अँड अर्न म्हणजेच खरेदी करा आणि कमवा अशी एक सुविधा देण्यात आली आहे. त्यामध्ये काही ठराविक साप्ताहिक आणि मासिक उद्दिष्ट पूर्ण करून युजर्स अधिकाधिक प्रोत्साहन मिळवण्याच्या संधीचा लाभ घेऊ शकतात. अशा आकर्षक योजनांमुळे ई-कॉमर्स ग्राहकांच्या अनुषंगिक लाभाचा मोठ्याप्रमाणात प्रचार आणि प्रसार होतो.

- Advertisement -

गेल्या दशकामध्ये तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी फ्लिपकार्टने अनेक उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांमधून नव्या पिढीच्या सामाजिक व्यापार प्लॅटफॉर्मला एक बळकटी मिळाली आणि भक्कम पाया निर्माण झाला. झिरो कमिशन धोरणाला पूरक व्यासपीठ म्हणून  फ्लिपकार्टच्या ऍड टेक सुविधेचा लाभ अनेक विक्रेत्यांना आधीच मिळाला आहे. तर फ्लिपकार्टची  किफायतशीर मालवाहतूक व्यवस्था आणि ‘फ्लिपकार्ट पे लेटर’ सारखी सुविधा हे दोन्ही फायदेशीर उपक्रमांमुळे  सामाजिक व्यापार क्षेत्रात मोठे परिवर्तन घडणार आहे.

यासंदर्भात बोलताना फ्लिपकार्टचे ग्रोथ अँड मॉनीटायझेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रकाश सिकारिया यांनी सांगितले कि, भारतातील प्रत्येकापर्यंत डिजिटल व्यापार पोहचवणे हा आमच्या शॉप्सी उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या नव्या सुविधेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या विकासाला वेग देण्यासाठी आम्ही आणखीही काही उपक्रम राबविणार आहोत. दर आठवड्याला शॉप्सी १०० टक्क्यांनी वाढत आहे. एका विशिष्ट सामाजिक ऍपप्रमाणे या मंचाचे प्रदर्शन असून त्यांच्या प्रसाराला सुरुवात झाली आहे. त्याला वेग देण्यासाठी, आम्ही आमच्या प्रगतीपथावर सर्वोत्कृष्ट ई-कॉमर्सला सामाजिक व्यापार क्षेत्रात आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ई-कॉमर्सच्या सुविधेचा सातत्याने विस्तार करण्यासाठी फ्लिपकार्ट बांधील असून शॉप्सी हे त्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे.’

- Advertisement -

शॉप्सी सुविधा दाखल झाल्यानंतर महिन्याभरात २ लाखापेक्षा जास्त यूजर्सनी नोंदणी केली आहे. आगामी दोन महिन्यात  सणासुदीच्या काळात आपल्या प्रगतीला अधिक गती देण्यासाठी आणि सामाजिक व्यापार क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी अनेक नव्या सुविधा आणि योजना जाहीर केल्या जाणार आहेत.

उद्योजक भारतीयांसाठी शॉप्सीने सामाजिक व्यापाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. आपल्या स्थानिक नेटवर्कच्या माध्यमातून फ्लिपकार्ट विक्रत्यांच्या १५ कोटी उत्पादनांच्या सूचीची माहिती, शॉप्सी युजर्सना आपल्या  सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन अँपवर शेअर करता येणार आहे.

सरलीकृत सोशल मीडिया इंटरफेसवर आपल्या उत्पादनांची सूची आणि पूर्ण क्षमतेच्या ईकॉमर्स सेवेची सुविधा उपलब्ध करून देताना, आपण व्यापाराचे लोकशाहीकरण करू शकतो आणि उदयोन्मुख सामाजिक व्यापार क्षेत्रांत परिवर्तन आणू शकतो असा फ्लिपकार्टला विश्वास आहे.

- Advertisement -