घरटेक-वेकFlipkarts ने लाँच केला पहिला स्मार्टफोन; जाणून घ्या किंमतीसह फीचर्स

Flipkarts ने लाँच केला पहिला स्मार्टफोन; जाणून घ्या किंमतीसह फीचर्स

Subscribe

ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टने आपला पहिला स्मार्टफोन म्हणून MarQ M3 Smart लाँच केला आहे. यापूर्वी, फ्लिपकार्टच्या MarQ ब्रँड अंतर्गत स्मार्ट टीव्ही आणि स्पीकर्स लाँच केले होते, त्यानंतर हा स्मार्ट फोन बाजरात विक्रीसाठी येणार आहे. MarQ M3 बजेट स्मार्टफोन आहे. याशिवाय फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. MarQ M3 स्मार्टची विक्री फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये असणार आहे.

MarQ M3 स्मार्ट स्मार्टफोनची किंमत 7 हजार 999 रुपये असली तरी सेल दरम्यान हा फोन 6 हजार 299 रुपयांना खरेदी करण्याची संधी ग्राहकांना असणार आहे. 2 जीबी रॅमसह फोनला 32 जीबी स्टोरेज असणारा फोन 7 ऑक्टोबरपासून ग्राहकांना खरेदी करता येईल. MarQ M3 Smart काळा आणि निळ्या रंगात उपलब्ध असून हा फोन Micromax In 2b, Realme C21Y, Lava Z2s सारख्या स्मार्टफोनशी टक्कर करणारा असणार आहे.

- Advertisement -

फ्लिपकार्टच्या या पहिल्या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असून त्याची प्रायमरी लेंस १३ मेगापिक्सलची तर दुसरी लेन्स डिजिटल असेल. फ्रंटला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. नाईट मोड, ब्यूटी मोड, स्लो मोशन, टाइमलॅप्स यासारखे फीचर्स कॅमेरासह या फोनला देण्यात आली आहे.

या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरीसह याफोनमध्ये फेस अनलॉक देण्यात आला असला तरी मात्र फिंगरप्रिंट सेन्सर या फोनला नसणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यामध्ये 3.5 मिमी ऑडिओ जॅक, मायक्रो यूएसबी, ड्युअल सिम कार्ड स्लॉट, वाय-फाय, ब्लूटूथ v4.2, जीपीएस, 4 जी सारखी भन्नाट फीचर्स असणार आहे.


पर्यटक आपला ब्रँड एम्बेसेडर होईल अशा सुविधा करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सूचना

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -