घरटेक-वेकआरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये त्रुटी, ९ कोटी वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात; फ्रेंच हॅकरचा दावा

आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये त्रुटी, ९ कोटी वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात; फ्रेंच हॅकरचा दावा

Subscribe

लोकप्रिय फ्रेंच हॅकर रॉबर्ट बाप्टिस्टेने आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये त्रुटी शोधून काढली आहे. आरोग्य सेतू अ‍ॅपमुळे ९ कोटी वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात आली असा दावा त्यांनी केला आहे.

भारताच्या कोरोना ट्रॅकिंग मोबाईल अॅप ‘आरोग्य सेतु’ अॅपमध्ये एक त्रुटी आढळली आहे. ज्यामुळे ९ कोटी वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात आली आहे. असा दावा एका फ्रेंच हॅकरने केला आहे. तसंच, राहुल गांधींनी या अ‍ॅपबद्दल जे काही सांगितलं आहे ते योग्य सांगितलं असल्याचंही त्याने म्हटलं आहे.

लोकप्रिय फ्रेंच हॅकर रॉबर्ट बाप्टिस्टेने (Robert Baptiste) म्हटलं आहे की त्यांना आरोग्य सेतु अ‍ॅपमध्ये मोठी त्रुटी आढळली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. आरोह्य सेतू अ‍ॅपला टॅग करत ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आरोग्यासेतु अॅपच्या सुरक्षिततेत त्रुटी आढळली आहे. ९ कोटी भारतीय वापरकर्त्यांच्या गोपनीयतेस धोका आहे. तुम्ही खासगीत संपर्क साधू शकता.”

- Advertisement -

या ट्विटमध्ये त्यांनी असंही लिहिलं आहे की राहुल गांधींनी आरोग्य सेतु अ‍ॅपबद्दल जे म्हटलं होतं ते बरोबर आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी अलीकडेच आरोग्य सेतू अ‍ॅप वापरकर्त्यांच्या गोपनीयतेविरूद्ध एक ट्विट केलं आहे. आरोग्य सेतु अॅपच्या माध्यमातून डाटा चोरी होत असल्याचं म्हटलं होतं. “आरोग्य सेतु एक अत्याधुनिक नजर ठेवणारी यंत्रणा आहे. याला एका खासगी ऑपरेटरला आउटसोर्स करण्यात आलंय. तसंच याच्याशी संबंधित कोणत्याही संस्थेची तपासणी नाही. यामुळे डाटा सुरक्षा आणि गोपनितेबद्दल अनेक चिंता व्यक्त होत आहेत. तंत्रज्ञान आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी मदत करतं, परंतु, नागरिकांना आपल्या संमतीशिवाय त्यांच्यावर नजर ठेवण्याची चिंता असू नये,” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं.


हेही वाचा – केंद्र आणि राज्यात समन्वयाचा अभाव – अशोक चव्हाण


- Advertisement -

जर आपल्याला रॉबर्ट बाप्टिस्टे यांच्याबद्दल माहिती नसेल तर तुम्हाला सांगतो की या फ्रेंच हॅकरने आधार लीकचा खुलासा केला होता. याशिवाय त्यांनी जगभरातील अनेक डेटा लीकचा खुलासाही केला आहे. दरम्यान, या ट्विटच्या सुमारे एक तासानंतर रॉबर्ट यांनी पुन्हा ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी असा दावा केला आहे की आरोग्य सेतू अ‍ॅपबाबत त्यांनी केलेल्या ट्विटच्या ४९ मिनिटानंतर इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्याशी संपर्क साधला आहे.

दुसर्‍या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं की, “माझ्या ट्विटच्या ४९ मिनिटांनंतर कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम म्हणजे सीईआरटी आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) च्या टीमने संपर्क साधला आणि मी त्यांना या अ‍ॅपच्या उणीवांबद्दल सांगितलं आहे.” विशेष म्हणजे सीईआरटी आणि एनआयसी दोन्ही भारत सरकारच्या संस्था आहेत. आरोग्य सेतु अ‍ॅपचा निर्माता एनआयसी आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -