Friendship Day 2021: तुमच्या Best Friendला गिफ्ट करा स्वस्तात मस्त ‘हे’ गॅझेट्स

आपल्या बेस्ट फ्रेंडला असे गिफ्ट द्यावे जे त्याच्या आयुष्यभर लक्षात राहिल

Friendship Day 2021: Gift your best friend 'these' gadgets
Friendship Day 2021: तुमच्या Best Friendला गिफ्ट करा स्वस्तात मस्त 'हे' गॅझेट्स

मैत्री सर्वांसाठी खास असते. असे म्हणतात मैत्रीपेक्षा कोणतेही नाते मोठे नसते. मित्रांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा खास असतो. तो क्षण आणखी खास करण्यासाठी प्रत्येक वेळी आपण प्रयत्न करत असतो. १ ऑगस्ट रोजी जागतिक मैत्री दिन आहे. आपल्या बेस्ट फ्रेंडला असे गिफ्ट द्यावे जे त्याच्या आयुष्यभर लक्षात राहिल असे सर्वांना वाटत असते. पण द्यायचे काय? असा प्रश्न सर्वांना पडतो? सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक गॅझेट्सना देखील खूप महत्त्व दिले जातय. या फ्रेंडशिप डेला आपल्या बेस्ट फ्रेंडला द्या आपल्या बजेटमध्ये एखादे इलेक्ट्रिक गॅझेट. काय आहे किंमत संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घ्या.

OnePlus Buds Z

 

तुमच्या मित्राला संगिताची आवड असले तर त्याच्यासाठी OnePlus Buds Z हे गिफ्ट देणे सर्वोत्तम ठरेल.
OnePlus Buds Z हे वायरलेस इअर फोन्स आहेत. एकदा चार्ज केल्यानंतर दिवसभर हे Buds वापरता येऊ शकतात. मुख्य म्हणजे हे Buds केवळ १० मिनिटात चार्ज होतात. यात ए़डवांस ब्लूटूथ ५.० टेक्नोलॉजी आणि ड्युअल मायक्रोफोन्स सारखे सर्वोत्तम फिचर्स मिळतात. अमेझॉनवर OnePlus Buds Z ची किंमत २,६९९ रुपये इतकी आहे.

Mi Smart Speaker

Mi Smart Speaker फ्रेंडशिप डेला आपल्या मित्राला देण्यासाठी एक उत्तम गिफ्ट आहे. ३,३९९ रुपयांना हे गिफ्ट खरेदी करता येईल. हा स्पीकर Google Assistant सोबत कनेक्ट करु शकता. त्याचप्रमाणे या स्पीकरची Audio Quality देखील मोठ्या स्पीकर्सच्या तुलनेत खूप चांगली आहे.

Xioami MI Band 2

तुमचा मित्र जर हेल्थ कॉन्शियस असले तर Xioami MI Band 2 त्याला गिफ्ट म्हणून देऊ शकता. यात हार्ट रेड मॉनिटर देखील देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे याचा डिस्प्ले देखील चांगला आहे. तुम्ही किती तास झोपलात, किती कॅलरी बर्न केलात हे सगळ यात ट्रॅक करता येते. याची किंमत १५०० रुपये इतकी आहे.

PLAYGO BH47

फ्रेंडशिप डे दिवशी आपल्या मित्राला गिफ्ट देण्यासाठी PLAYGO BH47 हे हेडफोन्स उत्तम गिफ्ट असेल. गॅलॅक्सी ब्लॅक कलरमध्ये हे हेडफोन्स उपलब्ध असून याची किंमत २,६९९ रुपये इतकी आहे. हे हेडफोन्स क्विक चार्ज होतात. एकदा चार्ज केल्यानंतर ३० तासांपर्यत ते वापरता येतात. क्लिअर साउंड सोबतच अनेक फिचर्स यात पहायला मिळतात.


हेही वाचा –  Friendship Day 2021: ‘या’मुळे साजरा केला जातो ‘फ्रेंडशिप डे’