Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक जुना फोन विकायचाय ? 'या' चार वेबसाईटवर मिळेल तगडी किंमत

जुना फोन विकायचाय ? ‘या’ चार वेबसाईटवर मिळेल तगडी किंमत

Related Story

- Advertisement -

टेक्नॉलॉजी म्हटलं की बदल हा आलाच. टेक्नॉलॉजी क्षेत्रात सतत बदल होत असतात. आपण एखादा नवा स्मार्टफोन घेतला तर तो ४-५ महिन्यांत आपल्याला जुना वाटू लागतो. कारण देखील त्याला तसंच आहे. मोबाईल कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा चालू आहे. मोबाई कंपन्या सातत्याने नवनवीन फीचर्स फोनमध्ये आणत असतात. त्यामुळे आपल्याला नवा फोन घ्यावासा वाटतो. मात्र नवा फोन घेण्याच्या नादात आपण आपला जुना फोन स्वस्तात विकून टाकतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला ठिकाणी काही वेबसाइट्स संबंधी खास माहिती देत आहोत. या वेबसाइटवर जुने फोन खरेदी करण्यात येत असून फोनची किंमत सुद्धा चांगली मिळते. या ठिकाणी फोन खरेदी करू शकता आणि विकू शकता. जाणून घ्या डिटेल्स.

कॅशिफाय (Cashify)

- Advertisement -

कॅशिफाय या वेबसाइटवर तुम्हाला फोनची किंमत चांगली मिळेल. स्मार्टफोन्समध्ये अन्य वेबसाइटच्या तुलनेत या वेबसाईटवर खूप चांगली किंमत मिळते. www.cashify.in वर तुम्हाला टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट, आयमॅक आणि गेमिंग कन्सोल विकू शकता. जे प्रोडक्ट विकायचा आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमची वस्तू विकू शकता.

कर्मा रिसायक्लिंग (Karmarecycling )

- Advertisement -

कर्मा रिसायक्लिंगवर आपले जुने आणि डिफेक्टिव स्मार्टफोन, टेबलेट सारखे गॅझेट सोप्या पद्धतीने विकू शकता. www.karmarecycling.in वर आतापर्यंत ३ लाख ६० हजार गॅझेट्सची खरेदी विक्री करण्यात आली आहे. यासाठी कोटींच्या घरात पेमेंट करण्यात आलं आहे.

इंस्टाकॅश (Getinstacash)

इंस्टाकॅशच्या https://getinstacash.in/ या वेबसाईटवर आपले कोणतेही जुने गॅझेट तुम्ही आरामात विकू शकता. या ठिकाणी बुकिंग झाल्यानंतर कंपनीचा कर्मचारी स्वतः घरी येऊन आपला फोन घेऊन जाईल.

यांत्रा (Yantra)

www.yaantra.com वर तुम्ही तुमचे जुने गॅझेट विकू शकता. चांगली किंमत तुम्हाला मिळू शकते. कंपनीचा दावा आहे की, त्यांच्या वेबसाइटवर केवळ ६० सेकंदात जुने फोन विकत घेतले जातात.

- Advertisement -