घरटेक-वेकमागे वळून पाहताना; जीमेलला १५ वर्ष पूर्ण

मागे वळून पाहताना; जीमेलला १५ वर्ष पूर्ण

Subscribe

ईमेलच्या दुनियेत सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या जीमेल या अॅप्लीकेशनला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. आज १५० कोटीपेक्षा जास्त लोक जीमेलचा वापर करतात. त्यामुळे हे जीमेलसाठी मोठे यश आहे.

गुगलच्या जीमेल या लोकप्रिय अशा अॅप्लीकेशनला आज १५ वर्ष पुर्ण होत आहेत. १ एप्रिल २००४ रोजी गुगलच्या पॉल बुकेटने जीमेल हे अॅप्लीकेशन लॉंच केलं होतं. आज मागे वळून पाहताना जीमेलमध्ये बरीच प्रगती झाली आहे. त्याकाळात जीमेलचा युजर्स होण्यासाठी दुसऱ्या युजर्सकडून इन्विटेशन मिळणं फार गरजेचं असायचं. इन्विटेशन मिळाल्याशिवाय जीमेलचा वापर करता येत नव्हता. परंतु, आता ते सहज सोपं झालं आहे. २००४ साली लॉंच झालेल्या जीमेलने १५ जीबीपर्यंत फ्री स्टोअरेज डेटाची सुविधा दिली होती. काळानुसार प्रगत होत या जीमेलने स्टोअरेज डेटा वाढवला. आज जीमेलमध्ये ५० एमबीपर्यंतच्या फाईल्स युजर्स जोडू शकतात. जीमेलच्या या १५ वर्षांच्या प्रवासात भरपूर बदल झाले. जीमलचे हे बदल ग्राहकांना आवडले आणि या बदलांना आनंदाने स्वीकारले.

आज १५० कोटीपेक्षा जास्त युजर्स

ईमेलच्या दुनियेत सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या जीमेलला आज म्हणजे १ एप्रिल २०१९ रोजी १५ वर्ष पुर्ण होत आहे. या १५ वर्षात जीमेलने ग्राहकांना साजेशी अशी सुविधा पुरवली. त्यामुळे या जगातील १५० कोटीपेक्षा जास्त लोक जीमेलचे युजर्स आहेत. जीमेलची ही सेवा गुगलकडून पुरवली जाते. इंटरनेटच्या क्षेत्रात गुगल ही सर्वात मोठी कंपनी आहे. या जगातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर गुगलवर उपलब्ध आहे. त्यामुळे गुगलच्या जीमेल या सेवेचा उपयोग जगभरातील युजर्स करतात.

- Advertisement -

१६ व्या वर्षात पर्दापण करताना…

१६ व्या वर्षात पदार्पण करताना जीमेलने महत्त्वाचे फिचर्स लॉंच केले आहेत. त्यामुळे आथा जीमेल युजर्सला आनंदाची परवणी मिळणार आहे. गुगलने आता जीमेल युजर्ससाठी स्मार्ट कंपोज फिचर आणले आहे. त्यामुळे आता युजर्सला ई मेल पाठवण्यात आणखी गती मिळणार आहे. या फिचरच्या मार्फत युजरला आता वाक्य पूर्ण करण्यात मदत होणार आहे. याशिवाय ऑफलाईन फिचरही गुगलने आणले आहे. या फिचरमुळे तुम्ही ऑफलाईन असूही ईमेल पाठवू शकणार आहात. तर नड्ज फिचरद्वारे युजरला कोणता मेल वाचला किंवा नाही याचे नोटीफिकेशन मिळणार आहे. असे अनेक फिचर्स गुगलने लाँच केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -