घरटेक-वेकGoogle New Rules: तुमचे वय १८ पेक्षा कमी आहे, तर जाणून घ्या...

Google New Rules: तुमचे वय १८ पेक्षा कमी आहे, तर जाणून घ्या इंटरनेट वापराचे नवे नियम

Subscribe

गुगलने (Google) ऑनलाईन सुरक्षा वाढण्याच्या दृष्टीकोनातून नियमांमध्ये बदल केले आहेत. १८ पेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी गुगल सर्च आणि युट्यूब (YouTube) वापराचे नियम कडक झाले आहेत. मुलांच्या गुगल आणि युट्यूबच्या वापरावर अंशतः बंदी घातली जाणार आहे. म्हणजेच १८ पेक्षा कमी वयाच्या मुलांना गुगल आणि युट्यूबचे सर्व फीचर्सचा आनंद घेता येणार नाही आहे. शिवाय मुलांच्या इंटरनेट सुरक्षेसाठी काही नवीन फिचर्स जारी गेले आहेत.

काय झालेत बदल?

  • १८ वर्षांखालील मुलांसाठी सर्व प्रकारच्या जाहिराती पाहण्यावर गुगलकडून बंदी घालण्यात येणार आहे. म्हणजेच विविध वयोगटांसाठी अॅडचे वर्गीकरण केले जाईल.
  • १८ वर्षांखालील मुलं एक स्टँडर्ड गुगल अकाउंट तयार करू शकणार नाहीत. परंतु त्यांना मर्यादित फीचर्ससोबत गुगल अकाउंट वापरण्याची परवानगी असेल.
  • तसेच गुगल हळूहळू त्याचे डिफॉल्ट अपलोड सेटिंगमध्ये बदल करणार आहे. १३ ते १७ वयोगटातील मुलं युट्यूब डिफॉल्ट अपलोड वापरू शकणार नाहीत. शिवाय सर्चला फिल्टर करण्याची सुविधा असेल. म्हणजेच ज्या टॉपिकला सेलेक्ट कराल, तोच टॉपिक गुगल सर्चमध्ये दिसेल.
  • लवकरच गुगलकडून मुलांसाठी नवं फिचर जारी करण्यात येईल, ज्याचे नाव SafeSearch असे असेल. यामध्ये मुलांचे गुगल अकाउंट कुटुंबियांसोबत लिंक असेल. यात १८ पेक्षा कमी वय असलेली मुल साइन-इन करू शकतील. अशाप्रकारे मुलं ऑनलाईन काय सर्च करत आहेत? याची माहिती घरच्यांना समजेल.
  • गुगलकडून Google Play Store वर नवीन सेफ्टी सेक्शन लाँच केले गेले आहे. याच्यामाध्यमातून कुटुंबातील लोकं आपलं मुलं काय डाऊनलोड करत आहे, हे पाहू शकतील. शिवाय मुलाने किती डेटा वापरला आहे, हे देखील समजेल. अशाप्रकारे पालक मुलांसाठी कोणता अॅप सुरक्षित आहे, हे पाहतील.

ऑनलाईन सुरक्षा वाढणार

गुगलचे किड्स अँड फॅमिली सेक्शनचे मॅनजर Mindy Brooks म्हणाले की, ‘डेटा आमचे प्रोडक्टला फंक्शन आणि सोयीस्कर बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे मुलांना कोणता डेटा वापरण्यास सुरक्षित आहे हे समजण्यास मदत करणे हे आमचे काम आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – Toyotaची भन्नाट ऑफर! मका, सोयाबीन द्या आलिशान Fortuner न्या


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -