Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर टेक-वेक Googleचे नवे वायरलेस इअरबड्स लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Googleचे नवे वायरलेस इअरबड्स लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Related Story

- Advertisement -

गूगलचे (Google) २०१९मध्ये ट्रू वायरलेस सीरीजचा पहिला मॉडेल Pixel Buds बाजारात आला होता. त्यानंतर आता यामध्ये अपडेट करून ट्रू वायरलेस सीरिजमध्ये (TWS) नवे इअरबड्स Google Pixel Buds A लाँच केले आहेत. गूगलचे हे वायरलेस इअरबड्स कंपनीच्या 12mmच्या डायनॅमिक कस्टम ड्रायवर्ससोबत येते. खासमध्ये यामधील असलेल्या Adaptive Sound फिचरच्या मदतीतून युझर ज्या जागी आहे, त्या ठिकाणानुसार याचा आवाज कमी, जास्त होता, असा दावा कंपनीने केला आहे.

अमेरिका आणि कॅनाडामध्ये याच्या प्री-ऑर्डरला सुरुवात झाली आहे. १७ जूनपासून या दोन्ही देशामध्ये गूगलचे नवे इअरबड्स विक्रीसाठी उपलब्ध होतील. पण भारतात Google Pixel Buds A केव्हा लाँच होतील याबाबत अद्यापही कोणती माहिती मिळालेली नाही. पण आज आपण गूगलच्या या नव्या इअरबड्सची किंमत आणि फिचर्स जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

फिचर्स

Bass Boost mode या फिचरला Google Pixel Buds A इअरबड्स सपोर्ट करते. यामुळे पॉवरफुल Bass ऐकायला मिळतो. तसेच यात कॅपेसिटिव्ह टच सेंसर उपलब्ध आहे आणि कॉल, म्युझिकसोबत इतर फिचर्ससाठी याचा वापर केला जाऊ शकतो. युजर्स यामध्ये गूगल असिस्टंटचा पर्याय देखील वापरू शकतात. या इअरबड्समध्ये इन-ईअर डिटेक्शनसाठी सिंगल IR proximity sensor आहे. यामुळे म्युझिक आपोआप बंद आणि चालू होते. पण यामध्ये नॉईज कॅन्सेलेशनची सुविधा नाही आहे. या इअरबड्समध्ये motion-detecting accelerometer, beamforming mics और IPX4 डस्ट आणि water resistant रेटिंगचा समावेश आहे. कनेक्टिव्हीटीसाठी इअरबड्स ब्लूटूथ ५.० सपोर्ट करते.

- Advertisement -

Google Pixel Buds Aमध्ये युजर्सला ५ तासांपर्यंत गाणी ऐकण्याची वेळ किंवा २.५ तासांपर्यंत टॉकटाईम मिळतो. तसेच २४ तासांपर्यंत प्लेबॅक टाईम किंवा १२ तासांपर्यंत टॉकटाईम प्रदान करते. फक्त १५ मिनिटे चार्जिंग केल्यामुळे ३ तास प्लेबॅक टाईम किंवा १.५ तासांपर्यंत टॉकटाईम मिळतो, असा कंपनीने दावा केला आहे. या गूगलच्या नव्या इअरबड्सची किंमत जवळपास ७ हजार २३० रुपये (९९ डॉलर) इतकी आहे.

- Advertisement -