घरGoogle Pay च्या लोगोमध्ये बदल; नव्या Icon मुळे युजर्समध्ये कन्फ्यूजन!
Array

Google Pay च्या लोगोमध्ये बदल; नव्या Icon मुळे युजर्समध्ये कन्फ्यूजन!

Subscribe

कसा असणार हा नवा लोगो जाणून घ्या...

Google pay अॅप्लिकेशनचा लोगो म्हणजेच आयकॉन बदलणार असल्याचे सांगितले जात आहे. Google pay चा नवा लोगो जुन्या लोगोपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. हा नवा लोगो कंपनीच्या थीम कलरवर आधारित असणार आहे. भारतात Google pay या अॅप्लिकेशनला तेज या नवाने लाँच केल्यानंतर या अॅप्लिकेशनचे नाव बदलण्यात आले होते. हे पेमेंट अॅप भारतात खूप प्रसिद्ध असून त्याचे कित्येक युजर्स देखील भारतात आहे.

- Advertisement -

सध्या असणाऱ्या Google Pay या अॅप्लिकेशच्या लोगोमध्ये Google चा G आणि नंतर Pay असे होते. मात्र या नव्या लोगोमध्ये तसे काहीच दिसत नाही. तर या नव्या लोगोमध्ये मल्टी कलरचा वापर केला असून त्यामध्ये निळा, हिरवा, पिवळा आणि लाल रंग युजर्सना दिसणार आहे. हेच रंग गूगलच्या ब्रँडिंगमध्येही वापरले जातात. या नव्या येणाऱ्या लोगोमध्ये लहान U आणि N हे अक्षर दिसत असून ते दोन्ही अक्षरं एकमेकांना ओव्हर लॅप करताना दिसताय. हा लोगो बघतांना युजर्सना 3 D सारखा दिसणार आहे. हा नवा लोगो बघून युजर्सना ते अॅप्लिकेशन आय़कॉन नेमके कशाचे हे हे लक्षात येणार नाही.

9to5google च्या मते, भारतातील काही युजर्सना Google Pay चे अपडेट देण्यात आले आहे. तर सध्या असलेल्या Google Pay अ‍ॅप चिन्हाच्या खालीGoogle Pay लिहिले आहे, परंतु होम स्क्रीनवर नवीन आयकॉनवर GPay लिहिलेले असणार असल्याचे सांगितले जात आहे. माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइट Twitter वर काही युजर्सने देखील या नव्या लोगोला ट्विट केले आहे. नवा लोगो Google Pay च्या 116.1.9 (बीटा) व्हर्जनसह लाँच करण्यात येणार आहे.

- Advertisement -

लवकरच Google Pay च्या फायनल बिल्डसह हे अॅप्लिकेशन लाँच करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच Google Pay चा नवीन लोगो तुमच्या स्क्रीनवर येणार आहे. मात्र, कंपनीने त्याबद्दल अधिक काहीही सांगितले नाही. दरम्यान गुगल काही काळापासून Gmail सह सर्व अॅप्सच्या चिन्ह आणि लोगोमध्ये बदल करीत आहे. हे सर्व नवे लोगो मल्टी कलरमध्ये बनवले जात आहे. सोशल मीडियावर लोक या लोगो किंवा चिन्हांमध्ये गोंधळ उडत असल्याच्या तक्रारी देखील करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -