घरटेक-वेकGoogle Photos साठी आता मोजावे लागणार पैसे, जाणून घ्या नव्या प्लॅनची किंमत

Google Photos साठी आता मोजावे लागणार पैसे, जाणून घ्या नव्या प्लॅनची किंमत

Subscribe

स्पेस संपल्यानंतर युझर्स Email सेंड (Send)किंवा रिसिव्ह (Receive)करु शकणार नाही.

गुगल फोटोस (Google Photos) हे आपल्या सर्वांच्या फोनमध्ये कायम असतं. ज्यात फोटो सेव्ह करुन ठेवता येतात. आपले फोटोस गुगल फोटोला सेफ आहेत असे आपण म्हणू शकतो. आतापर्यंत आपण फ्री मध्ये गुगल फोटोसचा वापर करत होतो. मात्र आता गुगल फोटोससाठी पैसे मोजावे लागणार आहे. अमेरिकी टेक कंपनी गुगलने Gmail युझर्ससाठी एक मोठा बदल केला आहे. गुगलने भारतात आता Google One सर्विस लाँच केली आहे. या सर्विसमुळे आता गुगल फोटोस वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ( (Google Photos now pays, find out the cost of the new Google one Plan) ) गुगल आतापर्यंत Gmail म्हणजेच Google Account होल्डरला गुगल फोटोससाठी स्पेस देत होते. दर महिन्याला एक्सप्रेस क्वॉलिटी किंवा हाय क्वालिटी अनलिमिटेड फोटोस गुगल फोटोसवर अपलोड करता येत होते. मात्र १ जूनपासून त्यासाठी पैसे देऊन नवीन प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. काय आहे Google Photos साठीचा नवा प्लॅन जाणून घ्या.

गुगलकडून युझर्सना १५GB स्पेस देण्यात येईल. ज्यात आपण Gmail,Google Drive आणि Google Photos वापरु शकतो. मात्र ही १५GB स्पेस संपल्यानंतर युझर्स Email सेंड (Send)किंवा रिसिव्ह (Receive)करु शकणार नाही. Emailपुन्हा सुरु करण्यासाठी दोन पर्याय दिले जातील. ज्यात पहिला पर्याय असेल तो म्हणजे तुमचा सर्व डेटा डिलीट करुन स्पेस तयार करणे आणि दुसरा पर्याय गुगल वरुन स्पेस विकत घेणे.

- Advertisement -

Google वरुन Space विकत घेण्यासाठी काय आहेत प्लॅन्स?

  • Google One नवीन सर्व्हिसद्वारे १३० रुपयांचा पहिला प्लॅन देण्यात आला आहे. हा प्लॅन दर महिना भरावा लागले. या प्लॅनमधून युझर्सना १००GB Cloud Space मिळेल. तर एक वर्षाच्या प्लॅनसाठी १,३०० रुपये मोजावे लागतील.
  • त्याचप्रमाणे २१० रुपयांचा दुसरा प्लॅन देण्यात आला आहे. ज्यात २०० GB Cloud Space मिळेल. एका वर्षांच्या प्लॅनसाठी २,१०० रुपये द्यावे लागतील.
  • Google One ने दिलेला तिसरा प्लॅन 2TB स्टोरेजचा आहे. यासाठी दरमहिना ६५० रुपये द्यावे लागतील. तर एका वर्षासाठी ६,५०० रुपये मोजावे लागतील.

या सर्व प्लॅनमध्ये गूगल एक्सपर्ट एक्सेस आणि फॅमिली मेंबर्सना अँड करु शकता. म्हणजेच तुम्हाला मिळालेली Space तुम्ही वाटू शकता.


हेही वाचा – Amazon Primeच्या ग्राहकांना मिळणार अर्ध्या किंमतीत सबस्क्रिप्शन

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -