Google Pixel 5 स्मार्टफोनमध्ये मिळणार पंच होल डिस्प्ले

Google Pixel 5 design leak reveals punch-hole display and dual rear cameras
Google Pixel 5 स्मार्टफोनमध्ये मिळणार पंच होल डिस्प्ले

गुगल (Google)ने नुकताच जागतिक बाजारात गुगल पिक्सल ४ए (Google Pixel 4a) स्मार्टफोन लाँच केला असून हा स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये भारतीय बाजारपेठेत लाँच होणार आहे. गुगल पिक्सल ४ए सोबतच कंपनी लवकरच पिक्सल ५ (Pixel5) आणि पिक्सल ४ए 5 जी (Pixel 4a 5G)देखील बाजारात लाँच होणार आहे. यासोबतच हे स्मार्टफोन केवळ निवडक बाजारात उपलब्ध होतील आणि यात भारताचा समावेश नाही, असेही स्पष्ट केले आहे. म्हणजेच हे स्मार्टफोन भारतात लाँच होणार नाहीत आणि युजर्सना गुगल पिक्सल ४एवर समाधानी राहावे लागेल. वास्तविक कंपनीने अद्याप पिक्सेल ५ आणि पिक्सेल ४ ए ५ जी ची लाँचच्या तारीख उघड केली नाही आहे. लीक्सनुसार, गुगल पिक्सल ५ पुढील महिन्यात ३० सप्टेंबरला लाँच होईल. या स्मार्टफोनचे काही फीचर्स समोर आले आहेत.

Pricebaba ने OnLeaks पार्टनरशिपसोबत अपकमिंग स्मार्टफोन गुगल पिक्सल ५ चे रेंडर्स शेअर केले आहेत. या रेंडर्सच्यानुसार, या स्मार्टफोनचे कटआऊट डिझाइनसह पंच होल डिप्स्ले दिला जाईल. जसेच की पिक्सल ४ए मध्ये दाखवले होते. पिक्सल ५ मध्ये स्क्वेअर आकारात ड्यूल रियर कॅमेरा सेटअप असेल. जो फोनच्या बॅक पॅनलला लॅफ्ट कॉर्नवर असेल. याशिवाय कॅमेरासह दोन इमेज सेंसर पण दिले जातील. त्यामधील एक फ्लॅस आहे. परंतु अद्याप या स्मार्टफोनच्या कॅमेरा मेगापिक्सेल बाबत कोणतीही गोष्ट उघडकीस आली नाही आहे.

या व्यतिरिक्त पिक्सेल ५मध्ये रियर फिंगरप्रिट सेंसर दिला गेला आहे. परंतु तो इन-डिस्प्ले नाही आहे. फोनच्या उजव्या बाजूला व्हॉल्यूम आणि पावर बटन आहे. तर बॉटममध्ये सिम ट्रे, स्पीकर ग्रिल आणि युएसबी टाईप सी पोर्ट दिला आहे. माहितीनुसार, गुगल पिक्सल५ मध्ये ५.७ इंचचा डिस्प्ले दिला गेला आहे. या स्मार्टफोनचे अधिक जाणून घेण्यासाठी तो लाँच होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.


हेही वाचा – POCO 120Hz डिस्प्लेचा स्मार्टफोन घेऊन येणार आणि OnePlus Nord देणार टक्कर!