घरटेक-वेकहोळीपूर्वी ‘रिलायन्स जिओ'चा सर्वात स्वस्त 'जिओ फोन नेक्स्ट' 

होळीपूर्वी ‘रिलायन्स जिओ’चा सर्वात स्वस्त ‘जिओ फोन नेक्स्ट’ 

Subscribe

मुंबईतील सर्व मोबाईल स्टोअरमध्ये उपलब्ध

होळीपूर्वी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. गुगल आणि रिलायन्स जिओ ने एकत्र काम करून तयार केलेला जिओफोन नेक्स्ट आता आकर्षक खरेदी पर्यायांसह मुंबईतील सर्व मोबाईल फोन आउटलेटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

प्रगती OS द्वारे समर्थित आणि Android OS ची ऑप्टिमाइझ केलेली आवृत्ती असलेल्या जिओफोन नेक्स्ट ची किंमत फक्त रु. 6499/- असून केवळ रु. 1999 च्या डाउन पेमेंट द्वारे देखील जिओफोन नेक्स्ट खरेदी केला जाऊ शकतो. उर्वरित रक्कम 18 ते 24 महिन्यांसाठी केवळ 300 ते 600 रुपयांच्या ईएमआयमध्ये भरली जाऊ शकते. कॉलिंग आणि डेटाचा खर्च फोनच्या ईएमआय पर्यायामध्येच समाविष्ट केला जाईल.

- Advertisement -

जिओफोन नेक्स्ट लाँच करताना श्री मुकेश डी अंबानी, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणाले, “ज्यांना इंग्रजी किंवा त्यांच्या भाषेतील सामग्री वाचता येत नाही ते जिओफोन नेक्स्ट द्वारे मजकूर भाषांतरित करू शकतात आणि वाचू शकतात. या स्मार्ट उपकरणावर त्यांची स्वतःची भाषा आहे. हे सांगताना मला अभिमान वाटतो की आम्ही ‘इंडिया’ आणि ‘भारत’ मधील अंतर कमी करत आहोत, कारण आता ‘भारत’ करणार डिजिटल प्रगती; प्रगती ओएस च्या साथीने.”

जिओफोन नेक्स्ट हा सध्या रु. 7000/- अंतर्गत सर्वोत्तम पर्याय उपलब्ध असून या सेगमेंट मध्ये अनोख्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण मोबाईल आहे.

- Advertisement -

जिओफोन नेक्स्ट च्या कॅमेऱ्यात इन-बिल्ट स्नॅपचॅट आणि ट्रान्सलेट फीचर आहे. ट्रान्सलेशन फीचरच्या माध्यमातून कोणत्याही भाषेतील मजकुराचा फोटो काढून तुम्ही ते तुमच्या स्वतःच्या भाषेत भाषांतरित करू शकता आणि ते ऐकूही शकता.

जिओफोन नेक्स्ट मध्ये मॅन्युअल टायपिंगची कोणतीही अडचण नाही. लाइव्ह ट्रान्स्क्राइब अॅप वापरून तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेत सहजपणे टाइप करू शकता. यामध्ये
OTG सपोर्ट देखील आहे. याचा अर्थ तुम्ही तुमचा OTG पेनड्राईव्ह फोनमध्ये वापरू शकता. यामुळे तुमच्यासाठी तुमच्या फोनचे स्टोरेज मॅनेज करणे सोपे करेल.

जिओफोन नेक्स्टची वैशिष्ट्ये 

– स्क्रीन – 5.45 इंच एचडी, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास
– जिओ आणि गुगल प्रीलोडेड अॅप्स, प्रगती ऑपरेटिंग सिस्टम
– ड्युअल सिम, ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स,
– अँटी फिंगरप्रिंट कोटिंग,
-13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा,
– बॅटरी 3500 mAh,
– प्रोसेसर स्नॅपड्रॅगन QM 215,2GB RAM, 32GB अंगभूत मेमरी, 512GB पर्यंत एक्सपांडेबल मेमरी
– ब्लूटूथ, वायफाय, हॉट स्पॉट, OTG सपोर्ट, जी सेन्सर, लाईट सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -