घरटेक-वेकGoogle search आता नव्या रूपात, सविस्तरपणे जाणून घ्या फीचर्स

Google search आता नव्या रूपात, सविस्तरपणे जाणून घ्या फीचर्स

Subscribe

नव्या फिचरमुळे ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सर्च करणे सोयीस्कर होणार

Google कडून नवीन सर्च फिचर्सची घोषणा करण्यात आली. लवकरच गूगल सर्च नव्या रुपात पहायला मिळणार आहे. त्यामुळे गूगलवर सर्च करताना युझर्सना आणखी मज्जा येईल असे गूगलने म्हटले आहे. त्याचप्रमाणे गूगलवर काहीही सर्च करणे देखील सोपे होईल. गूगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर यासंबंधी माहिती दिली आहे. गूगलकडून वर्चुअल सर्च टूल Google लेंन्स अपडेट करण्यात आले आहे. Google Lensमध्ये Al पॉवर्ड लॅग्वेंज हे नवीन फिचर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गूगलकडून नवीन लेंन्स मोड ऑप्शन देखील लाँच करण्यात येणार आहे. जे ISO बेस्ट Google Apps साठी असेल. काय आहेत गूगलचे नवीन फिचर्स, नव्या रुपातील गूगल सर्च कसे असेल सविस्तरपणे जाणून घ्या.

- Advertisement -

टेस्टसोबत इमेज सर्च करता येणार

गूगलकडून एडवान्स आर्टिफिशियल इंटेलिजेंस सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आलाय ज्यामुळे युझर्स गूगलवर टेस्टसोबत इमेज देखील सर्च करू शकणार आहेत. हे फिचर Google Lens सर्ट टूलसोबत सादर केले जाऊ शकते. या नव्या फिचरमुळे ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सर्च करणे सोयीस्कर होणार आहे.

 

- Advertisement -

गूगलचे सिनियर वाइस प्रेसिंडेंट प्रभाकर राघावन यांच्या म्हणण्यानुसार एडवान्स सर्चसाठी कोणतेही सर्ट पिक्चर सर्च केले तर गूगलकडून आणखी पॅटर्न दाखवण्यात येतील. जेणेकरुन युझर्स त्यांचा  सर्ट पॅटर्न निवडू शकतील. याचा उपयोग यू ट्यूब आणि इतर स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर देखील करण्यात येईल. जर तुमची बाईक खराब झाली तर त्याचा फोटो क्लिक करुन सर्च बॉक्समध्ये पोस्ट करुन बाईक दुरुस्त करण्याचे टुटोरिअल व्हिडिओ पाहता येतील.

गूगलवर आता सर्च करताना रिव्हर्स सर्च हा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. गूगल सर्च करताना डेस्कटॉपवर क्रोम ब्राउजरवर काही आवडले तर आणि त्यासारख्या इतर गोष्टींची देखील सर्च करण्याची इच्छा असेल तर रिव्हर्स सर्च उपयोगात येणार आहे. या फिचरचा उपयोग गूगल शॉपिंग तसेच Amazon.com सारख्या शॉपिंग वेब साईटवर देखील करता येणार आहे.


हेही वाचा – Price Hike: १ ऑक्टोबरपासून महागणार Toyota कार, जाणून घ्या नवी किंमत

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -