घरटेक-वेकGoogle Top Trends Of 2021: कोरोना लसीपासून IPL पर्यंत २०२१मध्ये Google सर्वाधिक...

Google Top Trends Of 2021: कोरोना लसीपासून IPL पर्यंत २०२१मध्ये Google सर्वाधिक वेळा विचारले गेलेले प्रश्न कोणते? जाणून घ्या

Subscribe

२०२१मध्ये कोविन आणि क्रिकेट गूगलवर सर्वाधिक वेळा सर्च केले गेले

आपल्या दररोज अनेक प्रश्न पडतात मग त्यातले काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण थेट गूगलवर जातो. गूगलकडे जगातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात. गूगलवर आपण एका प्रश्नाचं उत्तर मागितलं ती गूगल आपल्याला आपल्या प्रश्नासोबत आणखी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देतो. गूगने नुकतंच २०२१च्या टॉप ट्रेंड्सची ( Google Top Trends of 2021 ) ची लिस्ट जाहीर केली आहे. ज्यात गूगलवर २०२१मध्ये सर्वात जास्त वेळा सर्च केलेल्या प्रश्नांची यादी आहे. गूगलला सर्वाधिक वेळा विचारलेले प्रश्न कोणते होते पाहूयात कदाचित यातले काही तुम्ही आम्ही देखील गूगलला विचारले असतील.  कोणते आहेत ते प्रश्न पाहूयात.

गूगल टॉप सर्च

२०२१मध्ये कोविन आणि क्रिकेट गूगलवर सर्वाधिक वेळा सर्च केले गेले. ज्यात पहिल्या क्रमांकावर इंडियन प्रीमियर लीग, दुसऱ्या क्रमांकावर कोविन आणि तिसऱ्या क्रमांकावर ICC T20 वर्ल्ड कप आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर युरो कप आणि टोकियो ऑलिम्पिक पाचव्या क्रमांकावर आहे. गूगलच्या टॉप १० लिस्टमध्ये कोविड वॅक्सिन,फ्री फायर रिडीम कोड,नीरज चोप्रा,आर्यन खान आणि कोपा अमेरिका हे सर्वाधिक वेळा सर्च झाले झाले आहेत.

- Advertisement -

 

गूगलवर सर्वाधिक सर्च झालेले प्रश्न कोणते?

  • What is Black Fungus ( ब्लॅक फंगस म्हणजे का? )
  • What is the factorial of hundred (१०० चे फॅक्टोरियल काय आहे? )
  • What is the Taliban? ( तालिबान काय आहे? )
  • What is happening in afghanistan? ( अफगाणिस्तानमध्ये काय सुरू आहे? )
  • What is Remdesivir? ( रेमडिसिवीर काय आहे? )
  • What is Steroid? ( स्टेरॉइड काय आहे? )
  • What is Tooltik? ( टूलकिट काय आहे? )
  • What is Squid Game? ( स्क्विड गेम काय आहे? )
  • What is Delta Plus Variant? ( डेल्टा प्लस व्हेरिएंट काय आहे? )

 

- Advertisement -

यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी शानदान कामगिरी केली. नीरज चौप्राने भारताला पहिल्यांदा एथलँटिक्समध्ये पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. त्याचप्रमाणे आर्यन खान,टेस्लाचे सीईओ एलन मस्क सह अभिनेता विक्की कौशल,शेहनाज गिल आणि राज कुंद्रा ही नावं देखील गूगलवर सर्वाधिक वेळा सर्च केली गेली.

 

कोरोना वॅक्सिन संदर्भात सर्वाधिक सर्च

यंदा गूगलवर कोरोना वॅक्सिन संदर्भात देखील सर्वाधिक वेळा सर्च केले गेले. जगभरातील सर्वात मोठ्या लसीकरण अभियानाला सुरुवात झाली होती त्यामुळेच कोविन अँपवर लसीकरणासाठी स्लॉट बुक करणे तसेच कोरोना वॅक्सिनची उपलब्धता या सगळ्याची माहिती जाणून घेण्यासाठी लोक गूगलवर कोविन आणि वँक्सिन संदर्भात सर्वाधिक सर्च करत होते. त्याचप्रमाणे २०२१ च्या पहिल्या सहा महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली होती त्यामुळे या काळात वॅक्सिनेशन, कोविड टेस्ट,कोविड रुग्णालय,ऑक्सिडन सिलेंडर आणि सीटी स्कॅन सारख्या गोष्टी सर्वाधिक सर्च केल्या गेल्या.


हेही वाचा – Top Trends in Search 2021: २०२१मध्ये गूगलवर सर्वाधिक सर्च झालेले बॉलिवूड सेलिब्रेटी कोणते? जाणून घ्या

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -