घरटेक-वेकCovid vaccine आणि Test Report आता मोबाईलमध्येच होईल सेव्ह, गुगलचं नवं फिचर

Covid vaccine आणि Test Report आता मोबाईलमध्येच होईल सेव्ह, गुगलचं नवं फिचर

Subscribe

कोरोना विषाणुने साऱ्या जगाला वेठीस धरले आहे. परंतु या विषाणुला रोखण्यासाठी आता लसीकरण हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. त्यामुळे नागरिक स्वत:हून लसीकरणासाठी पुढे येत आहेत. कुठेही सार्वजनिक प्रवास करताना बाहेर जाताना आपल्याला कोरोना लसीकरण प्रमाणपत्र आणि कोरोना चाचणी अहवाल द्यावाल लागतो. या लसीकरण प्रमाणपत्रात तुम्ही कोणत्या लसीचे किती डोस घेतले याचा उल्लेख केला असतो. परंतु प्रत्येक वेळी लसीकरण प्रमाणपत्र घेऊन जाणे शक्य होत नाही. हीच अडचण जाणून घेत गुगलने एक नवे फिचर तयार केले आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोनवर तुमचे डिजीटल वॅक्सिनेशन कार्ड आणि कोरोना टेस्ट रिपोर्ट सेव्ह करु शकता.

 फिचरवर काम सुरु आहे 

गुगलने या फिचरवर काम सुरू केले आहे. यावर गुगल कंपनीने सांगते की, हे नवे फिचर आम्ही अँड्रॉइड युजर्ससाठी तयार केले आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स लसीकरण प्रमाणपत्रासह कोरोनासंबंधीत अन्य रिपोर्ट्स फोनमध्ये स्टोर करु शकतील. तसेच युजर्स त्या शॉर्टकट क्रिएट करत फोनच्या होमस्क्रीनवर सेव्ह करु शकतात. गुगलच्या या फिचरच्या मदतीने युजर्सला मोबाईलमध्ये डिजीटल कोव्हिड वॅक्सिनेशन सर्टिफिकेट आणि टेस्ट रिपोर्ट मोबईलमध्ये सेव्ह करण्यासाठी
हेल्थकेअर ऑर्गेनाइजेशन, सरकारी एजेंसीज आणि पब्लिक हेल्थ अथॉरिटीजने परवानगी दिली आहे.

- Advertisement -

लसींच्या बाबतीत, लसीचे प्रमाणपत्र ज्याप्रकारे कोणती लस कधी घेतली याची माहिती दर्शवते त्याचप्रकारे गुगलचे हे नवे फिचर काम करणार आहे. एखाद्या हेल्थकेअर प्रोव्हायडरने अ‍ॅप किंवा वेबसाइटद्वारे लसीकरण किंवा टेस्ट रिपोर्टची माहिती जाहीर केल्यानंतर तुम्ही या फिचरच्या मदतीने फोनवर ती माहिती सेव्ह करु शकता. याशिवाय आपण इंटरनेटशिवायही या फिचरमधील डॉक्युमेंट पाहू शकतो. परंतु या फिचरचे अँक्सेस घेण्यासाठी स्मार्टफोनचे अँड्रॉइड व्हर्जन किमान ५ असणे आवश्यक आहे. हे फिचर सर्वप्रथम अमेरिकेत लाँच केले जाईल त्यानंतर इतर देशामंमध्ये लॉन्च होईल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -