घरटेक-वेकइस्रोचे GSAT-7A वाढवणार इंटरनेट स्पीड

इस्रोचे GSAT-7A वाढवणार इंटरनेट स्पीड

Subscribe

श्रीहरीकोटातून उड्डाण करणारे GSAT-7A हे ३५ वे उपग्रह आहे. हा उपग्रह K-U बँडच्या उपभोकत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. या उपग्रहाचे वजन २ हजार २५० किलोग्रॅम इतके आहे.

सध्या 4G चा काळ सुरु आहे आणि लवकरच 5G येईल अशी घोषणा ट्रायने नुकतीच केली आहे. इंटरनेट वाढवण्यासाठी इस्रोनेदेखील कंबर कसली आहे. आज श्रीहरीकोटाच्या अंतराळ केंद्रातून ३५ व्या संचार सॅटेलाईटचे उड्डाण होणार आहे. GSAT-7A असे या उपग्रहाचे नाव आहे आणि इस्रोनो दिलेल्या माहितीनुसार संचार प्रणालीमध्ये सुधारणा आणण्याचे काम हे उपग्रह करणार असून याचा सगळ्यात जास्त फायदा इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी होणार आहे. कारण त्यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे.

आला रे आला 5G आला

GSAT- 7A ची वैशिष्टये

श्रीहरीकोटातून उड्डाण करणारे GSAT-7A हे ३५ वे उपग्रह आहे. हा उपग्रह K-U बँडच्या उपभोकत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. या उपग्रहाचे वजन २ हजार २५० किलोग्रॅम इतके आहे. देशातील संचारप्रणाली अधिक चांगली करण्यासाठी या उपग्रहाला अंतराळात सोडण्यात येणार आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार हे सॅटेलाईट मिशन तब्बल ८ वर्षांसाठी अंतराळात राहत सुविधा पुरवणार आहे. ज्यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे.

- Advertisement -
अंतराळयानाला पडले ‘छिद्र’, अंतराळातच केली दुरुस्ती

इस्रोचे ऐतिहासिक उड्डाण

भारतीय अंतराळ संशोधन अर्थात इस्रोने या आधी देखील संचार सुविधांसाठी उपग्रह अवकाशात सोडले आहेत. PSLV-C43 हा उपग्रह २९ नोव्हेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात आला. यासोबत अन्य देशांचे ३० उपग्रह देखील पाठवण्यात आले. इस्रोने इंटरनेट क्रांतीसाठी एकूण चार मोहिमा आखल्या आहेत. या आधी ५ डिसेंबर रोजी GSAT-11, १९ डिसेंबर रोजी GSAT-7A प्रक्षेपित करण्यात आले आज तिसरे उपग्रह अवकाशात झेपावणार आहे. तर पुढच्या वर्षी GSAT-20 हा उपग्रह प्रक्षेपित केले जाणार आहे. या सगळ्या उपग्रहांचे उद्दिष्ट संचार प्रणालीत सुधारणा करणे हेच आहे. यामुळे इंटरनेटचा स्पीड २०१९ पर्यंत १०० गीगाबाईट इतका वाढणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -