घरटेक-वेकतुमचा मोबाईल अ‍ॅन्टी व्हायरस पासून सुरक्षित आहे का?

तुमचा मोबाईल अ‍ॅन्टी व्हायरस पासून सुरक्षित आहे का?

Subscribe

प्ले स्टोरवर उपलब्ध असलेल्या अ‍ॅन्टी व्हायरसमुळेच व्हायरसचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. तीस टक्के अॅप्लिकेशन्स मुळे मोबाईल स्लो होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

तुमच्या मोबाईलमध्ये जर व्हायरस असेल तर त्याला काढण्याचे काम अॅन्टी व्हायरस करतो. स्मार्ट फोन्समध्ये काळानुसार फोन स्लो होत असल्याचे आपल्याला दिसते. फोन स्लो झाला म्हणजे त्यात व्हायरस आला असल्याची अनेकांनी समजूत होते. मग आता काय करावे? असा प्रश्न मोबाईल वापरणाऱ्याला पडतो. मोबाईल मधील व्हायरस काढण्यासाठी युजर्स अॅन्टी व्हायरस मोबाईलमध्ये डाऊनलोड करतो. या अॅन्टी व्हायरसने आपला फोन निट चालेल असे त्याला वाटते. मात्र याचा अनेकदा काहीच फायदा होत नाही. तुम्ही पण जर अशा पद्धतीने मोबाइलचा वापर करत असाल तर सावध व्हा. कारण की प्ले स्टोरवर असलेले अनेक अॅन्टी व्हायरस हे फेक असल्याची माहिती समोर आली आहे. या अॅन्टी व्हायरसमुळे मोबाईल स्लो होत असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

२५० अॅन्टी व्हायसरचे केले निरिक्षण

प्ले स्टोरमध्ये मोबाईल मधील व्हायरस काढण्यासाठी अॅन्टी व्हायरस सर्रास उपलब्ध असतात. ऑस्ट्रेलियन अॅन्टी व्हायरस कंपनीने प्ले स्टोर मधील २५० अॅन्टी व्हायरस अॅप्लीकेशनचे निरिक्षण केले. यामधील फक्त ८० अॅन्टीव्हायर योग्य असल्याची माहिती समोर आली आहे. या अॅन्टी व्हायरसमध्येच व्हायसर असल्याचे आढळून आले आहे. या व्हायरसमुळे मोबाईल फोन हॅंग होणे किंवा खाजगी माहिती चोरी होणे हे प्रकार होऊ शकतात. म्हणून अॅन्टी व्हायरस वापताना सावधानी बाळगणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -