घरटेक-वेकजबरदस्त! एकदा चार्ज करा आणि २०० किमी फिरा; जाणून घ्या या स्कूटरची...

जबरदस्त! एकदा चार्ज करा आणि २०० किमी फिरा; जाणून घ्या या स्कूटरची किंमत

Subscribe

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाहन कंपन्या त्यांच्या गाड्यांचे नवे मॉडेल लाँच करत आहेत. हीरोने देखील त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. हीरो इलेक्ट्रिकनेही (Hero Electric) इलेक्ट्रिक स्कूटर (Electric scooter) बाजारात आणली आहे. या स्कूटरला एकदा चार्ज केल्यावर २०० किमीहून अधिकचा प्रवास करु शकता. हिरोच्या या Hero Nyx-HX स्कूटरची दिल्ली शोरूममध्ये ६४ हजार ६४० रुपये किंमत आहे.

Hero Electric ने Nyx-HX स्कूटर कमर्शिअल वापराच्या दृष्टीने डिजाईन करण्यात आली आहे. या स्कूटरद्वारे खाण्या-पिण्याच्या वस्तूंची डिलीव्हरी करता येऊ शकते. याशिवाय, वजनदार सामानही घेऊन जाता येऊ शकतं. हीरोची ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर ८२ किलोमीटर ते २१० किलोमीटर धावते. स्कूटरचं सुरुवातीचं वेरिएंट पूर्ण चार्ज केल्यावर ८२ किलोमीटरपर्यंत चालेल. तर टॉप वेरिएंट २१० किलोमीटरपर्यंत चालेल.

- Advertisement -

या स्कूटरमध्ये अनेक फीचर्स दिले आहेत. ब्लूटूथ इंटरफेसद्वारे ऑन-डिमांड कनेक्टिव्हिटीसाठी चार लेवल मिळणार आहेत. ही स्कूटर ट्रॅक देखील करता येणार आहे. यासाठी कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरला ट्रॅक करण्याचीही सुविधा दिली आहे. या ई-स्कूटरमद्ये ०.६ kW इलेक्ट्रिक मोटर आहे. स्कूटरचा टॉप स्पीड ताशी ४२ किलोमीटर असून यात १.५३६ kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे.


हेही वाचा – पोटासाठी काहीही; कोरोनामुळे बंद पडलेल्या कोचिंग सेंटरला बनवलं जुगाराचा अड्डा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -