Honda City hybrid कार आज लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स

Honda City hybrid

भारतातील लाखो लोकांची आवडती आणि सर्वात खास सेडान कार Honda City आज हायब्रिडमध्ये कार लाँच करणार आहे. आज, 14 एप्रिल रोजी, Honda City eHEV चे लुक आणि फीचर्स सोबत, किंमत देखील समोर येईल. होंडा सिटीच्या या हायब्रीडमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर्स असणार आहेत. होंडा सिटी हायब्रीडमध्ये, त्याच्या दोन इलेक्ट्रिक मोटर्स वीज निर्मिती करतील आणि कालांतराने ते पेट्रोल इंजिन तसेच विजेवर चालतील.

नव्या हायब्रिड कारला दोन इलेक्ट्रिक मोटर्स

Honda City Hybrid आज V आणि ZX या 2 ट्रिम लेव्हल्ससह लाँच होणार आहे. सेडानमध्ये 0.734kWh लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे, जी पेट्रोल इंजिनसह कारला वीज पुरवेल आणि त्यामुळे कारचे मायलेज सुधारेल. सिटी हायब्रीडला होंडाच्या i-MMD हायब्रीड तंत्रज्ञानासह लाँच केले जाणार आहे. याचे पेट्रोल इंजिन 98bhp पॉवर आणि 127Nm टॉर्क जनरेट करेल. त्याच वेळी, त्याची इलेक्ट्रिक मोटर इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर (ISG) म्हणून काम करेल आणि ती 109bhp पॉवर आणि 253Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Honda City Hybrid चे मायलेज 30kmpl पर्यंत असू शकते.

संभाव्य किंमत…

Honda City Hybrid भारतात १८ लाख रुपयांपर्यंतच्या सुरुवातीच्या किंमतीसह ऑफर केली जाऊ शकते. Honda City Hybrid च्या लुक आणि वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, ही सेडान आतापर्यंतच्या सर्वात स्पोर्टी आणि स्टायलिश अवतारात दिसणार आहे. या सेडानमध्ये मागील आणि पुढच्या बंपरसह ग्रिल दिसतील. नवीन Honda City Hybrid मध्ये प्रगत ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम सारख्या स्टँडर्ड वैशिष्ट्यांसह सर्वोत्कृष्ट स्टँडर्ड वैशिष्ट्ये मिळतील.