घरटेक-वेकआता फोन करा पटापट चार्ज! ३० नाही ६० नाही तर १००W फास्ट...

आता फोन करा पटापट चार्ज! ३० नाही ६० नाही तर १००W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेला Honorचा नवा फोन लाँच

Subscribe

Honor 50 Pro, Honor 50 आणि Honor 50 SE हे तीन फोन कंपनी लाँच करत आहे

सध्या बाजारात अनेक नवीन स्मार्टफोन लाँच होत आहेत. Honor कंपनीने त्यांचे नवीन दमदार स्मार्ट फोन्स लाँच केले आहेत. Honor 50 ची सिरीज आता बाजारात आली आहे. या सिरीजच्या अंतर्गत Honorने तीन फोन लाँच केले आहेत. Honor 50 Pro, Honor 50 आणि Honor 50 SE हे तीन फोन कंपनी लाँच करत आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे या फोनमध्ये देण्यात आलेली चार्जिंग बॅटरी. फोनला १००Wचा फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि १०८ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. horonच्या सीरिजमधील या तिन्ही स्मॉर्ट फोन्सचे फिचर्सचे काय आहेत? जाणून घ्या. (Honor launches new Honor 50 Pro phone with 100W fast charging support)

Honor 50 Pro

Honor 50 Pro हा एंड्राइड ११ वर आधारित Magiv UI 4.2 वर काम करतो. फोनला १००Wचा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आलेला आहे. या फोनला ६.७२ इंचाचा फुल HD प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात पिक्सल्स रेझ्युलेशन २६७६ x १२३६ आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा १०८ मेगापिक्सल देण्यात आलाय. तर दुसरा कॅमेरा ८ MP अल्ट्रा वाइ़ड अँगल लेन्स आहे आणि तिसऱ्या कॅमेरामध्ये २ MP डेप्थ सेंसर आणि चौथा सेन्सर २ MP असलेली मायक्रो लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये ड्युअल सेल्फी सेन्सर देण्यात आलाय. ज्यात प्रायमरी सेन्सर ३२MPआणि दुसरी वाइड अँगल लेन्स १२ MP देण्यात आलाय. Honor 50 Proमध्ये ४०००mAh बॅटरी देण्यात आलीय.

- Advertisement -

Honor 50

Honor 50 हा फोन एंड्राइड ११ वर आधारित Magic UI 4.2 पर काम करतो. या फोनमध्ये ६.५७ इंचाचा फुल HD प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा १०८MP चा आहे. तर दुसरा कॅमेरा ८ MP अल्ट्रा वाइ़ड अँगल लेन्स आणि तिसरा कॅमेरा २ MP डेप्थ सेन्सर आणि चौथा सेंसर २ MPचा मायक्रो लेन्स देण्यात आली आहे. Honor 50मध्ये ३२ MPचा सेल्फी कॅमेरा देण्यात आलाय. तर ४३००mAh बॅटरी देण्यात आलीय. यात ६६W सुपरचार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Honor 50 SE

Honor 50 SE हा फोन देखील एंड्राइड ११ वर आधारित Magic UI 4.2 पर काम करतो. यात ६.७८ इंचाचा फुल HD प्लस डिस्प्ले देण्यात आलाय. त्याचप्रमाणे फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. ज्याच प्रायमरी कॅमेरा १०८MPइतका आहे. तर ८ MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. तिसरा २ MPचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. Honor 50 SE या फोनला १६ MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आलाय. तर फोनला ४०००mAh ची बॅटरी देण्यात आलीय. Honor 50 SE फोनला ६६Wचा सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Covid-19 विरोधातील लढाई जिंकण्यासाठी Lancet दिले भारताला ८ सल्ले, जाणून घ्या

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -