घरक्राइमतुमच्या नावावर किती मोबाईल नंबर रजिस्टर आहेत? या प्रकारे लगेच जाणून घ्या,...

तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर रजिस्टर आहेत? या प्रकारे लगेच जाणून घ्या, नाहीतर होईल डोक्याला ताप

Subscribe

आजकाल आपल्या आजपास अनेक फ्रॉड केसेस पाहायला मिळतात. यातीलच एक फ्रॉड केसे म्हणजे सिम कार्ड फ्रॉड किंवा आधार कार्ड फ्रॉड. समाजातील काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड करून अनेकांना गंडा घालतात. तुमच्या पैकी किती जणांचा मोबाईल नंबर रजिस्टर आहे का? कारण यातून तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की, तुम्ही कशा प्रकारे तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर रजिस्टर आहे हे माहिती करून घेऊ शकता.

जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की, तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर रजिस्टर आहे. तर हे तुम्हाला अगदी सहज कळू शकते. तुम्ही याला दूरसंचार विभागाच्या (DOT) पोर्टलद्वारे सुद्धा जाणून घेऊ शकता. तुम्हाला इथून कळेल की, तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत. (DOT) पोर्टलला ‘टेलीकॉम एनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अॅन्ड कंज्यूमर प्रोटेक्शन’ (TAFCOP)असं सुद्धा म्हणटलं जातं. दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार एक नागरिक आपल्या आधार कार्डद्वारे 9 मोबाईल नंबर वापरू शकतो.

- Advertisement -

या प्रकारे जाणून घ्या तुमच्या आधार कार्डशी किती मोबाईल नंबर रजिस्टर :

  • TAFCOP ची आधिकारिक वेबसाइट खोला – https://tafcop.dgtelecom.gov.in/
  • इथे तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर टाका. तुम्हाला एक OTP येईल.
  • इथे OTP टाकून साइन इन करण्यासाठी वेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करा.
  • पुन्हा एकदा साइन इन प्रोसेस पूर्ण करा.
  • आता तुम्ही एका नव्या पेज वर जाल, जिथे तुम्हाला वेगवेगळे नंबर दिसतील जे तुमच्या आधार कार्डशी जोडलेले असतील.

 

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -