Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक UPI पिन विसरलात! Google Pay वर पिन बदलण्याचा जाणून घ्या सोपा मार्ग

UPI पिन विसरलात! Google Pay वर पिन बदलण्याचा जाणून घ्या सोपा मार्ग

Related Story

- Advertisement -

कोरोना महामारीदरम्यान, कित्येक लोकं डिजिटल पेमेंट करण्याकडे वळले आहेत. ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी गुगल पे या अॅप्लिकेशनचा सर्वाधिक वापर केल्याचे दिसून आले असून हे अॅप्लिकेशन सुरक्षित असून त्यावर पैसे पाठवण्याची प्रक्रिया सोपी आहे. मात्र पैसे ट्रान्सफर करण्यासाठी UPI पिन आवश्यक असतो, कारण त्याशिवाय ऑनलाइन पेमेंट करणं शक्य नसते. बऱ्याचदा कित्येक युजर्स त्यांचा UPI पिन विसरतात, त्यानंतर त्यांना ऑनलाइन पेमेंट करता येत नाही. जर तुम्ही सुद्धा तुमचा UPI पिन विसरला असाल आणि तुम्हाला पिन रीसेट करण्याचा असाल, तर या सोप्या पद्धतीने तुम्ही पिन तयार करू शकतात. ज्याच्या मदतीने तुम्ही Google Pay वर UPI पिन सहज बदलू शकता.

असा बदला Google Pay चा UPI पिन

  • Google Pay चा UPI पिन बदलण्यासाठी, वरच्या उजव्या बाजूला तुमच्या फोटोवर क्लिक करा. त्यानंतर बँक अकाऊंटवर टॅप करा
  • तुमचे अकाऊंट निवडा ज्यांचा पिन तुम्हाला बदलायचा आहे. आता Forgot UPI PIN यावर क्लिक करा
  • येथे तुमच्या डेबिट कार्डाची expiry डेटसह शेवटचे सहा अंक टाका. त्यानंतर तुम्हाला
    नवीन UPI ​​पिन तयार करता येईल
  • तुम्हाला तुमच्या नंबरवर OTP मिळेल. हा OTP टाकल्यानंतर तुमचा नवीन UPI ​​पिन जनरेट होईल

Google Pay वर असा बघा तुमचा बँक बँलेन्स

  • बँक बँलेन्स तपासण्यासाठी गुगल पे वर जा
  • गुगल पे वर गेल्यानंतर आता खाली स्क्रोल करा
  • येथे तुम्हाला View Account Balance चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा
  • त्यानंतर पिन टाका. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक बॅलन्सची माहिती मिळेल

Google ने Google Pay युजर्ससाठी स्मॉल फायनान्स बँकेसोबत भागीदारी केली आहे. या अंतर्गत, आता युजर्सला Google Pay वर फिक्स्ड डिपॉझिटची सुविधा मिळेल. युजर्सला फिक्स्ड डिपॉझिटवर वार्षिक ६.३५ टक्के व्याज देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.


Indian Railways: रेल्वेच्या ‘लेट मार्क’वर सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका; रेल्वेला मोठी नुकसान भरपाई

- Advertisement -