घरटेक-वेकIRCTC कसे बुक करायचे ऑनलाईन तिकीट?

IRCTC कसे बुक करायचे ऑनलाईन तिकीट?

Subscribe

रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी IRCTCवर आपले अकाऊंट असणे गरजेचे

एक काळ होता ज्यावेळेस तिकीट काढण्यासाठी मोठ्या रांगा लावाव्या लागत होत्या. रेल्वे स्टेशनवर तिकीटासाठी रांगा लावण्यात आपला बराचसा वेळ खर्च होत होता. मात्र आता इंटरनेटच्या जमान्यात सगळी कामे सोप्पी झाली आणि प्रवासाची तिकिटे देखील ऑनलाईन बुकींग करणे सुरू झाले. भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC ही भारतीय रेल्वेची एक शाखा आहे जी भारत सरकारच्या अधिपत्याखाली येते. IRCTCच्या माध्यमातून भारतीय रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी तिकीट, खाण्याच्या वस्तू, पर्यटनासारख्या सेवा मिळवू शकतात. सणासुदीच्या काळात तिकीट बुकींग करण्यासाठी IRCTC चा मोठा फायदा होतो. भारतीय रेल्वेने नुकताच IRCTC एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात मोबाईल फोन,डेक्सटॉप किंवा लॅपटॉप वरुन तिकीट कसे बुक करायचे याविषयी माहिती दिली आहे.

- Advertisement -

IRCTCने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी IRCTCवर आपले अकाऊंट असणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. IRCTCवर आपले अकाऊंट कसे तयार करायचे आणि तिकीट कशी बुक करायची जाणून घ्या.

IRCTC वर अकाऊंट कसे तयार कराल?

  • IRCTCच्या irctc.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरा.
  • नंतर फोटोमध्ये दिलेल्या केप्चा कोडमध्ये टेक्ट टाकून Submit या पर्यायवर क्लिक करा.
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या अधिकृत मोबाईल क्रमांकावर किंवा ईमेलवर व्हेरिफिकेशन कोड येईल.
  • अशाप्रकारे IRCTC वर तुमचे अकाऊंट तयार होईल.

IRCTC अँप किंवा वेबसाइटवर ऑनलाइन तिकीट कसे बुक कराल?

  • पहिल्यांदा IRCTCचे अँप किंवा irctc.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • आपल्या क्रेडेंशियल्सचा वापर करुन लॉन इन करा.
  • त्यानंतर Book Your Ticket या पर्यायावर क्लिक करा.
  • बोर्डिंग आणि गंतव्य स्थान सिलेक्ट करा.
  • नंतर प्रवास करण्याची तारीख सिलेक्ट करा आणि सिट्स उपलब्ध आहेत का ते पहा.
  • सिट्स उपलब्ध असल्यास Book Now या पर्यायावर क्लिक करा.
  • तिकीट बुक करण्यासाठी तुमची आवश्यक माहिती द्या त्यानंतर मोबाईल क्रमांक आणि केप्चा कोड टाका.
  • शेवटी पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड,नेट बँकींग किंवा यूपीआय या पर्यायापैकी एका पर्यायाने पेमेंट करा.
  • पेमेंट केल्यानंतर तुमचे तिकीट बुक झाल्याचा मेसेज तुमचा फोन क्रमांक किंवा ईमेलवर येईल.

    हेही वाचा – जगातील नंबर वन कंपनी बनली Samsung, दुसऱ्या क्रमांकावर Apple तर तिसऱ्या क्रमांकावर आहे ‘ही’ कंपनी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -