घरटेक-वेकआयफोनवर ios12 डाऊनलोड करताय? त्यापूर्वी घ्या 'ही' काळजी

आयफोनवर ios12 डाऊनलोड करताय? त्यापूर्वी घ्या ‘ही’ काळजी

Subscribe

अॅपलने WWDC 2018 या जागतिक परिषदेमध्ये आयओएस १२ ही नवी ऑपरेटिंग सिस्टीम लाँच केली. आयफोन तसेच आयपॅडमध्ये वापरता येईल अशी नव्या आणि अत्याधुनिक फिचर्सने परिपूर्ण असलेली अशी आयओएस १२ ही ऑपरेटिंग सिस्टिम आहे. आयफोन आणि आयपॅड वापरणारे लोक आता त्यांच्या उपकराणांमध्ये आयओएस १२ थेट डाऊनलोड करुन त्याचा लाभ घेऊ शकतात.

डाऊनलोडपूर्वी घ्या ‘ही’ काळजी

मात्र, तुमच्या आयफोन किंवा आयपॅडवर ios 12 ही नवीन ऑपरेटिंग सिस्टिम डाऊनलोड करण्यापूर्वी काही गोष्टी जरूर तपासून घ्या. सर्वप्रथम तुमच्या आयफोन वा आयपॅडमधील सर्व ‘डेटा’चा आय क्लाउडवर बॅकअप घ्या. जेणेकरुन तुमची कोणतीही महत्वाची माहिती गहाळ अथवा डिलीट होणार नाही. सहसा नव्या ऑपरेटिंग सिस्टिमधील काही टेक्निकल बग्समुळे तुमच्या फोनमधील डेटा, सिस्टिम इन्स्टॉल करतेवेळी उडून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे बॅकअप घ्यायला विसरु नका.

- Advertisement -

‘असे’ करा ios12 डाऊनलोड

तुमच्या आयफोन किंवा आयपॅडमध्ये ओएस अपडेट करण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. त्यापैकी एक पर्याय म्हणजे तुम्ही ९९ डॉलर्स इतकी किंमत भरुन अॅपल डेव्हलपर प्रोग्रॅममध्ये एनरोल होऊ शकतात.

‘या’ उपकरणांना ios12 सिस्टिम करेल सपोर्ट

आयफोन X
आयफोन 8
आयफोन 8 प्लस
आयफोन 7
आयफोन 7 प्लस
आयफोन 6 एस
आयफोन 5 एस

- Advertisement -

——————-

आयपॅड प्रो सेकंड जनरेशन (12.9 इंची)
आयपॅड प्रो फर्स्ट जनरेशन (12.9 इंची)
आयपॅड प्रो- 10.5 इंची
आयपॅड प्रो- 9.7 इंची
आयपॅड एअर 2
आयपॅड एअर
आयपॅड फिफ्थ जनरेशन
आयपॅड मिनी 4
आयपॅड मिनी 3
आयपॅड मिनी 2
आयपॅड टच सिक्स जनरेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -