तुमचं Aadhaar Card नकली तर नाही? ‘या’ स्टेप्स फॉलो करत एका मिनिटात चेक करा

तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आधार कार्ड क्रॉस व्हेरिफाय करु शकता.

How to find out aadhar card shared is nit fake
तुमचं Aadhaar Card नकली तर नाही? एका मिनिटात करा चेक

आधार कार्ड (Aadhaar Card) नसंदर्भात केंद्र सरकारने शुक्रवारी एक अॅडव्हायजरी जारी केली होती. यात आधारकार्डची फोटोकॉपी कोणत्याही खाजगी संस्थांना शेअर न करण्याच आदेश दिले होती. यानंतर सरकारने यावर यू-टर्न घेत आपली अॅडव्हायजरी मागे घेतली. भारतीयांसाठी आधार कार्ड हे एक महत्वाचे Aadhaar Card कागदपत्र आहे. ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापरले जाते. कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावर ठेवताना, भाड्याने घर घेताना, बँकेतील कामांसाठी तसेच शाळा, कॉलेडच्या अॅडमिशनसाठीही आता आधार कार्डची गरज लागते. मात्र तुमचे आधार कार्ड बनावट आहे की खरं हे तुम्ही कसे ओळखाल? हे शोधणं अगदी सोपे आहे. हे जाणून घेण्यासाठी तुम्ही UIDAI वेबसाइटची मदत घेऊ शकता. याच्या मदतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड क्रॉस व्हेरिफाय करु शकता. दरम्यान तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आधार कार्ड क्रॉस व्हेरिफाय करु शकता.

Aadhaar Card क्रॉस व्हेरिफाय करण्याची ऑनलाईन पद्धत

1) सर्व प्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/verifyAadhaar या लिंकवर जा.

2) आता तुमचा आधार क्रमांक टाका.

3) तुमच्या स्क्रिनवर आता वय, लिंग, राज्य आणि आधार कार्डचे शेवटचे तीन अंक याबद्दल माहिती दिसेल.

4) सर्व माहिती व्यवस्थित असल्यास तुमचं आधारकार्ड व्हेरिफाय आहे. म्हणजेच खरं आहे.

Aadhaar Card क्रॉस व्हेरिफाय करण्याची ऑफलाईन पद्धत

1) तुम्ही सर्व प्रथम अॅप स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअरवरून आधार Aadhaar QR scanner अॅप डाउनलोड करावा लागेल.

२) आता आधार कार्ड आधारवर असलेला QR कोड स्कॅन करा.

3) दरम्यान आधार कार्डवर असलेला QR कोड UIDAI द्वारे डिजिटली स्वाक्षरी केलेला असतो.. हे सिक्युअर आणि टेम्पर प्रूफ आहे. याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही आधार कार्डची सहज पडताळणी करू शकता.


हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी Instagram करणार मदत; नवं फिचर AMBER देणार अलर्ट