तुमचा स्मार्टफोन कोणत्या Appमुळे होतोय स्लो, कसे घ्यायचे जाणून?

how to find out what app is slowing down android here is complete process

स्मार्टफोन नवीन असल्यावर तो व्यवस्थित चालतो. पण त्याचा वापर वाढल्यामुळे डिव्हाइस स्लो होण्याची समस्या वाढते. कारण सोशल मीडियावर App आणि हाय परफॉर्मेंस ग्राफिक गेम्स आदी जास्त रॅम कंज्युम करतात. त्यामुळे अशा परिस्थितीत कोणत्या Appमुळे स्मार्टफोन स्लो होत आहे, हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला असे काही सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही कोणत्या Appमुळे डिव्हाईसचे रॅम आणि स्टोरेज जास्त कंज्युम होत आहे, हे जाणून घेऊ शकला. यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी वाचेल आणि डिव्हाइस फास्ट होईल.

कोणता App तुमच्या स्मार्टफोनला स्लो करत आहे? असे घ्या जाणून

  • प्रथम सेटिंगमध्ये जा.
  • सेटिंगमध्ये गेल्यानंतर स्टोरेज/ मेमरीवर क्लिक करा
  • स्टोरेज लिस्टमध्ये तुम्हाला समजेल की, कोणता कंटेंट आपल्या फोनची स्पेस सर्वात जास्त घेत आहे. येथे तुम्हाला इंटरनल मेमरीचे पण दिसेल.
  • यानंतर मेमरीवर क्लिक करा आणि नंतर Memory used by apps क्लिक करा.
  • ही लिस्ट आपल्याला रॅमची ४ इंटरवल्स ( ३ तास, ६ तास, १२ तास आणि १ दिवस) मध्ये App युसेज दिसेल म्हणजे वापरलेले App दिसेल.
  • आता तुम्हाला समजले की, कोणता App मोबाईल रॅमचा किती वापर करत आहे.

या माहितीच्या आधारे तुम्ही जास्त रॅम कंज्युम करत असलेला App अनइंस्टॉल करू शकता. जर तुमचे इंटरनल स्टोरेज फूल झाले असेल तर फोन स्लो होण्याचे मोठे कारण आहे. त्यामुळे मोबाईलचे इंटरनल स्टोरेज थोडे ठेवा. यामुळे तुमच्या मोबाईलची स्पीड वाढले. तसेच तुमचा फोन प्रत्येक दिवसाला रिस्टार्ट करायला विसरू नका.

मोबाईल स्टोरेज असे वाढवा

एसडी कार्ड किंवा युएसबी स्टोरेजमध्ये Appला मुव्ह करा. अनेक असे App असतात जे एसडी कार्ड किंवा युएसबीमध्ये मुव्ह करू शकत नाही. तुम्ही सेटिंग्समध्ये इंडिव्हिज्युअल एप्लिकेशनमध्ये जाऊन चेक करू शकता. तुम्ही इंडिव्हिज्युअरलला इंडिव्हिज्युअल किंवा कोणत्याही Appच्या माध्यमातून एकत्र मुव्ह करू शकता.


हेही वाचा – Jio Phone साठी सर्वात स्वस्त प्लान; ४० रुपयांपेक्षा कमी किंमतीत करा अनलिमिटेड कॉलिंग!