Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर टेक-वेक तुमच्या आधार कार्डचा कोणी गैरवापर करतंय का? कसं ओळखाल?

तुमच्या आधार कार्डचा कोणी गैरवापर करतंय का? कसं ओळखाल?

Related Story

- Advertisement -

आधार कार्ड हे महत्वाचे कार्ड झालं आहे. नवीन सिम कार्ड घ्यायचं असेल किंवा घर घ्यायचं असेल नाहीतर लोन घ्यायचं असेल प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड गरजेचे आहे. पण याचमुळे आधार कार्डचा गैरवापर होत असल्याच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. यामुळे तुमच्या परवानगीविना कोणी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर करत नाही ना हे चेक करणे गरजेचे आहे.

तुमचे आधारकार्ड ज्याच्याकडे आहे ती व्यक्ती तुमच्या गेल्या सहा महिन्याच्या आधार कार्ड वेरिफीकेशनची माहिती मिळवू शकतो. म्हणजेच गेल्या सहा महिन्यात तुमचे आधार कार्ड कुठे आणि किती वेळा वापरले गेले. याची बित्तंबातमी समोरील व्यक्ती मिळवू शकते. याची पडताळणी करण्यासाठी काय करायचे?…

  • UIDAI च्या ऑफिशियल साइट https://resident.uidai.gov.in/ वर क्लिक करा.
  • त्यानंतर वेबसाईटच्या डाव्या बाजूला ‘My Aadhaar’ चे ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा.
  • मग ‘Aadhaar Services’ वर क्लिक करा.
  • Aadhaar Authentication History वर क्लिक करा.
  • नंतर १२ अंकांचा आधार नंबर आणि कॅप्चा भरा.
  • त्यानंतर खातरजमा करण्यासाठी ‘Send OTP’वर क्लिक करा.
  • ओटीपीवर क्लिक केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी संबंधित माहिती तुम्हाला मिळेल.
  • ती चेक केल्यानंतर तुमचे आधार कार्डचा कोणी गैरवापर करत असल्याचा संशय आल्यास तात्काळ फ्री नंबर १९४७ या नंबरवर कॉल करा. अथवा [email protected] वर ईमेल करून तक्रार दाखल करता येते.
  • तसेच https://resident.uidai.gov.in/file-complaint यावर ऑनलाईन तक्रारही तुम्ही करू शकता.
- Advertisement -