घरटेक-वेकव्हॉट्सअॅपचे स्टेटस आता फेसबुकवरही शेअर करता येणार

व्हॉट्सअॅपचे स्टेटस आता फेसबुकवरही शेअर करता येणार

Subscribe

सोशल नेटवर्किंग साईट्समध्ये सर्वात मोठी वेबसाईट असलेल्या फेसबुकने आपल्या युजर्ससाठी आणखी एक नवं फिचर आणलंय. गेल्या काही काळापासून फेसबुक मॅसेंजर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम या तीनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फेसबुकशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. युजर्सनी आपल्या चारही प्लॅटफॉर्मवर रेंगाळत राहावं यासाठी फेसबुक नेहमीच नवं नवीन फिचर आणत असतं. फेसबुकनं नुकतंच व्हॉट्सअॅपच्या नवीन व्हर्जनमध्ये ‘व्हॉट्सअॅप बाय फेसबुक’ असं ब्रँडिंग केलंय. आता फेसबुकने आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. व्हॉट्स स्टेटस अपडेट करणं हे आता चागंलच प्रचलित झालं होतं. हे स्टेटस फिचर आता फेसबुकशी कनेक्ट करण्यात आलंय.

युजर्सला आता व्हॉट्सअॅप स्टेटस अपडेट करताना फक्त फेसबुक ऑप्शनला क्लिक करावं लागेल की झालं. पुर्वी फेसबुक स्टोरी स्टेटस अपडेट करण्यासाठी फेसबुक अॅप मध्ये जा, तिथे फिल्टर वापरा, स्टिकर किंवा टेक्स्ट टाकण्याची कटकट करावी लागत होती. मात्र आता केवळ व्हॉट्सअॅप स्टेटस अपडेट करताना तुम्हाला तेच स्टेटस तुमच्या फेसबुकच्या मित्रांना दाखवणं देखील सोप्प होणार आहे.

- Advertisement -

व्हॉट्सअॅप स्टेटस, फेसबुक स्टोरी किंवा इन्स्टाग्राम स्टोरी या फिचरमध्ये तुम्ही फोटो, व्हिडिओ किंवा टेक्स्ट अपडेट करु शकता. जो केवळ २४ तासांसाठी तुमच्या फ्रेंड सर्कलला दिसतो. २४ तासानंतर हा स्टेटस आपोआपच डिलिट होतो. व्हॉट्सअॅपचे हे अपडेटेड फिचर अँड्रॉईड आणि आयओएस या ऑपरेटिंग स्टिटिम्सवर वापरता येणार आहे.

या पद्धतीने तुम्ही व्हॉट्सअॅप स्टेटस शेअर करा फेसबुकवर

– व्हॉट्सअॅपला स्टेटस अपडेट करा

- Advertisement -

– फेसबुकवर शेअर करण्यासाठी संबंधित स्टेटसला टॅप (क्लिक) करा

– फेसबुक या पर्यायाल टॅप करा

– त्यानंतर फेसबुकवर स्टेटस अपडेट करण्यासाठी व्हॉट्सअॅप तुमच्याकडे परवानगी मागेल. त्यावरही पुन्हा टॅप करा

– शेवटी शेअर नाऊ या पर्यायाला टॅप करा की झाले फेसबुक स्टोरी अपडेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -