इंटरनेटशिवाय Googleचे हे फिचर करते काम; जाणून घ्या वापर करण्याची सोपी पद्धत

how to use google maps without internet
इंटरनेटशिवाय Googleचे हे फिचर करते काम; जाणून घ्या वापर करण्याची सोपी पद्धत

जगभरात गूगल (Google) अनेक सर्व्हिसेस ऑफर करते. टेक्नोलॉजीचे दिग्गज ब्रँडचे पोर्टफोलियोमध्ये बरेच असे अॅप्स आहेत, जे सर्वोत्तम फिचर्ससोबत येतात. असा एक अॅप आहे गूगल मॅप्स (Google maps), जो युजर्सला रस्ता दाखवता. गूगल मॅप्सचा वापर हा ऑफलाईन पद्धतीने होऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का?

गूगल मॅप्समध्ये मॅप सेव्ह करण्याचे एक फिचर आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही ऑफलाईन गूगल मॅप्स वापर करू शकता. जेव्हा तुम्ही कोणत्याही रिमोट एरियापासून जात असता किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसते अशा वेळी या फिचरचा चांगलाच फायदा होतो. इंटरनेटशिवाय गूगल मॅप्स रस्ता दाखवते.

दरम्यान ऑफलाईन मोडमध्ये तुम्हाला रिअल टाईम ट्रॅफिक अपडेट मिळत नाही. तुम्हाला फक्त सेव्ह केलेल्या मॅप्समध्ये डायरेक्शन मिळू शकते. एवढेच नाही तर ऑफलाईन मोडमध्ये तुम्हाला अल्टरनेटिव्ह रूट्स आणि इतर फिचर्स मिळत नाही. त्यामुळे जाणून घ्या तुम्ही गूगल मॅप्सचा ऑफलाईन पद्धतीने कसा वापर करू शकता?

असा करू शकता मॅप सेव्ह?

सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गूगल मॅप्सचा अॅप ओपन करावा लागले आणि त्यानंतर प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करावा लागले, जो टॉप राईट कॉर्नवर मिळेल. त्यानंतर तुम्हाला ऑफलाईन मॅप्सचे ऑप्शन मिळेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. मग तुम्हाला सिलेक्ट Your Own Mapचे ऑप्शनवर जावे लागेल. त्यानंतर तुम्ही पिंच इन किंवा आउट करून तुम्ही तुमच्या मर्जीचा मॅप डाऊनलोड करू शकता. मॅप सिलेक्ट केल्यानंतर युजर्सला डाऊनलोड ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे डाऊनलोड केलेला मॅप एक्सपायर होण्यापूर्वी अपडेट केला पाहिजे.


हेही वाचा – Google Play Pass भारतात लाँच, ‘या’ सब्सक्रिप्शन सर्व्हिसना होणार ‘हे’ फायदे