घरटेक-वेककसे वापराल इन्स्टाग्राम लाइव्ह रूम फिचर ?

कसे वापराल इन्स्टाग्राम लाइव्ह रूम फिचर ?

Subscribe

इन्स्टाग्राम लाइव्ह रूम असे या फिचरचे नाव आहे. याआधी फक्त एक ते दोन जणच लाइव्ह वर दिसू शकत होते. या नव्या फिचर्समुळे आता आणखी तीन युझर्ससोबत लाइव्ह जाता येणार आहे. 

इन्स्टाग्राम नेहमीच युझर्ससाठी नव नवीन फिचर्स घेऊन येत असते. इन्स्टाग्रामने आता युझर्ससाठी एक नवे फिचर आणले आहे. इन्स्टाग्राम लाइव्ह रूम असे या फिचरचे नाव आहे. याआधी फक्त एक ते दोन जणच लाइव्ह वर दिसू शकत होते. या नव्या फिचर्समुळे आता आणखी तीन युझर्ससोबत लाइव्ह जाता येणार आहे.

या फिचरची अर्ली टेस्टिंग भारताता केली होती. भारत हा पहिला देश आहे ज्याला हे फिचर देण्यात आले आहे.इन्स्टाग्रामचे हे नवे फिचर लाँच करतेवेळी सांगितले होते की, भारतात मार्च महिन्यापासून लाइव्ह व्यूजमध्ये वीक ऑन वीक वीक बेसीसवर ६० टक्के वाढ झाली आहे. कंपनी आपल्या नव्या फिचरमुळे क्रिएटर्स पर्यत पोहचण्यासाठी मोठी मदत करणार आहे.

- Advertisement -

हे फिचर वापरायचे कसे?

  • तुमच्या स्टोरीज ट्रेच्या वरच्या भागात एक प्लसचे चिन्हा दिसेल. तिथे क्लिक केल्यानंतर होम नेविगेशन बारच्या वरच्या टॅबवर क्लिक करा. तिथे क्रिएट प्लस साइन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर खाली स्क्रोल करून लाइव्ह कॅमेरा या ऑपशनवर क्लिक करा. त्यानंतर टायटल Add करण्यासाठी मेन्यू दिसतील त्याचा तुम्ही वापर करू शकता.
  • लाइव्ह जाण्यासाठी सर्कुलर बटणावर क्लिक करा. ज्याच्यासोबत लाइव्ह स्ट्रिम करायची त्या तुमच्या मित्रमंडळींना गेस्ट या ऑपशनमध्ये Add करा.
  • त्यानंतर तुम्हाला लाइव्हमध्ये तुम्ही Add केलेल्या लोकांच्या रिकवेस्ट दिसतील. त्यानुसार तुम्ही लाइव्ह जाताना त्यांना रिकवेस्ट पाठवू शकता.
  • अशाप्रकारे तुम्ही इन्स्टाग्रामवर आपल्या मित्रमंडळींसोबत लाइव्ह स्ट्रिमिंग करू शकता.

फेसबुकवरही क्रिएट रूम असे फिटर देण्यात आले आहे. त्यानंतर आता इन्स्टाग्रामवर लाइव्ह रूम फिचर देण्यात आले आहे.


हेही वाचा – बाजारात येतेय स्वस्त इलेक्ट्रिक बाईक; एकदा चार्ज करा, १५० किमी फिरा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -