घरटेक-वेकआज Amazfit Stratos 3 स्मार्टवॉच लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स

आज Amazfit Stratos 3 स्मार्टवॉच लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स

Subscribe

आज भारतात हुआमी कंपनीने Amazon Stratos 3 स्मार्टवॉच लाँच केले आहे. हे स्मार्टवॉच स्मार्टफोनच्या ई-कॉमर्स वेबसाइट Flipkartवर आज रात्री ८ वाजता विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनी हे स्मार्टवॉच १५ ते २० हजार रुपयांच्या प्राइस सेगमेंटमध्ये लाँच करू शकते. Flipkart शिवाय हे स्मार्टवॉच Amazfit India या अधिकृत स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

Stratos 3 स्पोर्ट्स ओरिएंटल स्मार्टवॉच आहे. यात ८० वेगवेगळे मोड्स, हार्ट रेट मॉनिटरिंग आणि FIRSTBEAT प्रोफेशनल लेवल स्पोर्ट्ससोबत पॅक केले गेले आहे. या स्मार्टवॉचमध्ये १.३४ इंचाची राउंडेड डिस्प्ले आहे. यामध्ये ३२०/३२० पिक्सल रेजोल्यूशन आहे. यामध्ये ग्राहकांना गोरिल्ला ग्लास २ प्रोटेक्शन मिळेल. कंपनीने १४ दिवस बॅटरी लाइफ देण्याचा दावा केला आहे. पण भारतात या स्मार्टवॉचमध्ये काही बदल होऊ शकतात. या स्मार्टवॉचमध्ये जीपीएस ट्रॅकर देखील आहे. डिव्हाइसमध्ये अल्ट्रा-एंड्योरेंस मोड, VO2Max,एक्सरसाइज इफेक्ट (TE), एक्सरसाइज लोड (TD) आणि रिकव्हरी टाइम डेटा सारखे प्रोफाइल असतील. हे स्मार्टफोन ५० मीटर खोल पाण्यात खराब होणार आहे.

- Advertisement -

Stratos 3 स्पोर्ट्स मोडच्या यादीत कर्लिंग, स्नोबोर्डिंग, स्की, डाउनहिल स्की, आउटडोअर स्केटिंग, इनडोअर स्केटिंग, क्रॉस कंट्री स्की, फेंसिंग, कराटे, बॉक्सिंग, जूडो, कुस्ती, ताई ची, म्यू थाई, तायक्वांडो, मार्शल आर्ट्स, किकबॉक्सिंग, शिकार यांचा समावेश आहे. फिशिंग, स्केटबोर्ड, पॅडलबोर्डिंग, रोलर स्केटिंग, रॉक क्लाइंबिंग, तिरंदाजी, हॉर्स रायडिंग, माउंटन बाइकिंग, बीएमएक्स, क्रिकेट, बेसबॉल, बॉलिंग, स्क्वॅश, रग्बी, बास्केटबॉल, सॉफ्टबॉल, गेटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, हॉकी, हॅन्डबॉल, बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक्स, योग, बॅलेट, बेली नृत्य, स्क्वेअर नृत्य, स्ट्रीट नृत्य, बॉलरुम नृत्य , नृत्य आणि झुम्बा यांचा देखील समावेश आहे.


हेही वाचा – भारतावर सर्वात मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -