घरटेक-वेकHyundai च्या नव्या Alcazar SUV कारचं बुकिंग सुरू; जाणून घ्या अनोखे फीचर्स

Hyundai च्या नव्या Alcazar SUV कारचं बुकिंग सुरू; जाणून घ्या अनोखे फीचर्स

Subscribe

Hyundai इंडियाने SUV सेग्मेन्टमध्ये आपली बहुप्रतिक्षित अल्काझर Alcazar कारचे बुकिंग सुरू केले आहे. ही SUV कार येत्या 10 दिवसात लॉन्च होणार असल्याचे सांगितले जात आहे. कार बुक करण्यासाठी ग्राहकांना 25 हजार रुपये आगाऊ पेमेंट म्हणून जमा करावे लागतील. Alcazar भारतातील ह्युंदाईची पहिली 7 सीटर SUV कार आहे. ही कार 6 आणि 7 सीट केबिनच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. या कारला 1.5 लिटर डिझेल इंजिन पर्यायासह एक नवीन 2.0 लिटर पेट्रोल इंजिन मिळणार आहे. Alcazar ही कार क्रेटा प्रमाणेच तयार केली गेली आहे परंतु केवळ नावातच नाही तर फीचर्समध्येही सर्वाधिक वेगळेपण आहे.

तुम्ही Alcazar च्या स्टँडर्ड व्हेरिएंटला 6 आणि 7 सीटच्या प्रकारांमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये 6 सीट्स व्हर्जन सर्वाधिक पसंतीस उतरत आहे. त्याच्या दुसर्‍या रांगेत एक टच टिप देण्यात आले आहे. या कारचा टॉप अँड थोडा छोटा ठेवला आहे जेणेकरून आत 6 किंवा 6 सीटरची एडजस्टमेंट चांगल्याप्रकारे करता येऊ शकते. 6 सीटर दुसर्‍या रांगेत बर्‍याच भिन्न फीचर्स देण्यात आले आहेत. या भागात कप होल्डर आणि वायरलेस चार्जिंगचे फीचर्स दिले गेले आहे.

- Advertisement -

हे आहेत कारचे इतर अनोखे फीचर्स

  • याशिवाय साइड फूटस्टेप, मागील विंडो सनशेड आणि स्लाइडिंग सनव्हायझर देखील या कारला देण्यात आले आहेत.
  • या कारच्या panoramic सनरुफला तुमच्या आवाजाने देखील नियंत्रण ठेवू शकता.
  • तसेच, यात एसी व्हेंट्स आणि Bose 8 speaker ची उत्कृष्ट साऊंड सिस्टीम देण्यात आली आहे. त्याच्या आतील भागातील इंटीरियरमध्येही लाइटिंगची उत्तम व्यवस्था आहे.
  • पडल लॅम्पशिवाय, एकाधिक डिस्प्ले डिजिटल क्लस्टर देखील यात जोडले गेले आहेत. त्याचा टच स्क्रीन आकार क्रेटाइतकाच मोठा आहे. यासह वायरलेस चार्जिंगचा पर्यायही त्यात आहे.
  • त्याचे व्हीलबेसही क्रेटापेक्षा 2,760 मिमी इतका लांब ठेवण्यात आला आहे.

Alcazar च्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 2.0 लिटर, फोर सिलेंडर इंजिन दिले असून जे 158 बीएचपी पॉवर आणि 191 एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकतो. यासह डिझेल प्रकार 1.5 लिटर, फोर सिलेंडर टर्बोचार्ज्ड मोटर असून ज्या 112 बीएचपी आणि 250 एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकतो. दोन्ही व्हेरिएंट 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह असणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -