घरटेक-वेकहॅकर्सपासून मोबाईल सुरक्षित ठेवायचा आहे, तर 'या' टिप्स फॉलो करा

हॅकर्सपासून मोबाईल सुरक्षित ठेवायचा आहे, तर ‘या’ टिप्स फॉलो करा

Subscribe

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले. याकाळात मोबाईलचा वापर झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे हॅकिंगच्या घटनांमध्येही वाढ झाली. अलीकडेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांनी केरळ पोलीस आणि सोसायटी फॉर पोलिसिंग ऑफ सायबर स्पेस अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी रिसर्च असोसिएशनच्या वतीने डेटा प्रायव्हसी आणि हॅकिंग कॉन्फरन्सला संबोधित करताना सांगितले की, ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना लोकांनी सावध राहिले पाहिजे. यामुळे त्यांचा वैयक्तिक डेटा आणि पैसे सुरक्षित राहतील. पण सध्या हँकिगच्या घटनेपासून आपला मोबाईल कसादूर ठेवायचा हा प्रश्न उद्भवतो. त्याचचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. या कोरोना काळात हॅकर्सपासून आपल्या मोबाईल सुरक्षित ठेवायचा असेल तर काय करायचे हे जाणून घ्या.

मजबूत पासवर्ड ठेवा

- Advertisement -

सहसा मजबूत पासवर्ड ठेवणे थोडे अवघड आहे. यासाठी तुम्ही पासवर्ड मेकिंग Appचा वापर करू शकता. या Appच्या माध्यमातून मजबूत पासवर्ड तयार करू शकला आणि आपली माहिती पूर्णपणे सुरक्षित ठेवू शकाल. तुम्ही पासवर्ड मेकिंग App गूगल प्ले-स्टोअर आणि App स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता.

स्मार्टफोन सॉफ्टवेअर सतत अपडेट करा

- Advertisement -

प्रत्येक टेक कंपन्या नियमितपणे त्याच्या युजर्सना स्मार्टफोन सॉफ्टवेअर अपडेट पाठवत असतात. यामध्ये सिक्युरिटी पॅचपासून ते विविध सर्व सिक्युरिटी फिचर समाविष्ट असतात. युजर्सने स्मार्टफोन सॉफ्टवेअर अपडेट सतत केले पाहिजे. यामुळे वैयक्तिक डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो. तर हॅकर्सना देखील फोन हॅक करण्याची संधी मिळत नाही.

अज्ञान नंबरवरून आलेले मेसेज ओपन करू नका

काहीवेळी हॅकर्स मोबाईल हॅक करण्यासाठी अज्ञात नंबरवरून मेसेज करतात. या मेसेजमध्ये अशी एक लिंक असते, ज्याच्या मदतीने हॅकर्स सहजपणे फोनची सिक्युरिटी क्रॅक करतात. हॅकर्स व्हायरसच्या माध्यमातूनफोनमधील सर्व वैयक्तिक डेटा चोरतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की, अज्ञात नंबरवरील कोणत्याही मेसेजमधील लिंक क्लिक ओपन करू नका.

मोबाईल Appचे परमिशन पेज काळजीपूर्वक वाचा

तज्ञांचे मत आहे की, युजर्सनी कोणतेही मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याचे परमिशन पेज वाचले पाहिजे. एखादा App संपर्क आणि लोकेशन यासारख्या अधिक गोष्टी विचारत असल्यास तो App डाऊनलोड करू नका. यामुळे फोन हॅक होण्यासह वैयक्तिक डेटा लीक होण्याची शक्यता वाढते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -