घरटेक-वेकसेल्फीमुळे होणारे मृत्यू; 'हे' अॅप रोखणार

सेल्फीमुळे होणारे मृत्यू; ‘हे’ अॅप रोखणार

Subscribe

 या अॅपशी फोन कनेक्ट केल्यानंतर जर तुमच्या कॅमेराने कोणते धोकादायक दृष्य कॅप्चर केले तर तो युजरला म्हणजेच सेल्फी घेणाऱ्यााला लगेच अलर्ट करेल.

धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी घेण्याच्या धाडसामुळे अपघात झाल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. या अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे पण असं असलं तरी आजही अनेकजण सेल्फीसाठी जीवावर उदार होताना दिसतात. मात्र, आता जीवघेण्या सेल्फीमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी एक नवीन अॅप आलं आहे. हे अॅप सेल्फी घेणाऱ्या व्यक्तीला संभाव्य धोक्याची किंवा संकटाची सूचना देतील आणि त्यांना अलर्ट करेल. ‘सेफ्टी’ असं या अॅपचं नाव असून दिल्लीच्या इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशनच्या संशोधकांनी हे अॅप विकसती केलं आहे. सेफ्टी अॅप बनवणाऱ्या टीमचे प्रमुख प्रोफेसर पी. कुमारगुरु यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हे अॅप सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी व्हावे याकरता उचललेले एक पाऊल आहे. मोबाईलचा कॅमेरा जे छायाचित्र पाहतो त्याचेच रिअल टाईमध्ये अॅनिलीसीस करतो. या अॅपशी फोन कनेक्ट केल्यानंतर जर तुमच्या कॅमेराने कोणते धोकादायक दृष्य कॅप्चर केले तर तो युजरला म्हणजेच सेल्फी घेणाऱ्यााला लगेच अलर्ट करेल.’

घ्या जाणून : बेळगावमध्ये का पाळतात ‘काळा दिवस’?

इंटरनेटशिवाय चालणार अॅप…

सेफ्टी अॅपचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे हे अॅप मोबाईलचं इंटरनेट (डेटा पॅक) बंद असतानाही काम करु शकणार आहे. तुमच्या मोबाईलचं इंटरनेट बंद असेल आणि तुम्ही रेल्वेरुळ, खोल दरी किंवा उंचवट्यासारख्या कोणत्याही असुरक्षित जागी उभे असाल तर हे अॅप लगेच याविषयी तुम्हाला अलर्ट करेल, अशी माहिती प्रोफेसर कुमारगुरू यांनी दिली. या अॅपच्या माध्यमातून सेल्फीमुळे होणारे अपघात टळण्यास नक्की मदत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -