घरटेक-वेकआयआयटीची 'EvoX' रेसिंगसाठी सज्ज

आयआयटीची ‘EvoX’ रेसिंगसाठी सज्ज

Subscribe

आयआयटीचे विद्यार्थी नवनवे शोध लावत प्रयोगशीलता दाखवत असतात. आता एक रेसिंग कार तयार करुन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सगळ्यांना थक्क करण्यासाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी ‘EvoX’ ही कार तयार केली आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फॉर्म्युला रेसिंग कारच्या स्पर्धेत धावण्यासाठी ही कार सज्ज झाली आहे

सिल्व्हरस्टोन येथे होणार स्पर्धा

- Advertisement -

जगातली सगळ्यात मोठी मोटरस्पोर्ट कार रेसिंग स्पर्धा येत्या जुलै महिन्यात सिल्व्हर स्टोन, युके येथे होणार आहे. जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या गाड्या या स्पर्धेत सहभागी होणार आहे. मेकनिकल इंजिनीअरींच्या विद्यार्थ्यांसाठी जगातील सगळ्यात मोठी अशी ही स्पर्धा असून विद्यार्थ्यांमधील गुणांना वाव मिळण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. यात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या गाडीचे डिझाईन, इंजिन, गाडीचा परफॉर्मन्स बघितला जातो. शिवाय रेसिंगवेळी टीमचे समन्वय कसे आहे हे पाहिले जाते. आयआटीची ‘EvoX’ आता रेसिंगसाठी सज्ज असून आयआयटीचे संचालक देवांग खाकर यांच्या हस्ते नुकतेच या EvoX’ चे अनावरण करण्यात आले. आता ही स्पोर्टस कार स्पर्धेत कशी कामगिरी करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

EVOCPic4
आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली रेसिंग कार ‘EvoX’

‘EvoX’ रेसिंग कारची वैशिष्टये

- Advertisement -

⦁ EvoX’ ही सिक्सथ जनरेशन रेसिंग कार आहे.
⦁ सेल्फ डेव्हलप्मेंट बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम यात आहे
⦁ 40KQ मोटर्सचं या गाडीचे इंजिन आहे.
⦁ एअरोडायनॅमिक विंग्ज आणि पावरट्रेन डिझाईन
⦁ ०-१०० किमी प्रतितास अतंर अवघ्या २.८८ सेकंदात करणार पार करेल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -