video : Flipkart वर मागवला iPhone 12 मिळाला निरमा साबण

flipkart Big billion days

ई कॉमर्स कंपन्यांचे मोठे ऑनलाईन सेल जाहीर झाले की खरेदीसाठी एकच झुंबड उडते. मोठ्या प्रमाणात अशा सेलमधील वस्तु खरेदीसाठी ग्राहकांचा कल असतो. ई कॉमर्स साईट्सवरून येणाऱ्या वस्तुंच्या निमित्ताने अनेकदा वेगवेगळ्या बातम्या वाचायला मिळतात. त्यामध्ये पार्सलमध्ये अपेक्षित वस्तुएवजी वीट, साबण अशा गोष्टी मिळाल्याच्याही तक्रारी येतात. अशाच एका घटनेत एका ग्राहकनाने iphone 12 एवजी पॅकेजिंग बॉक्समध्ये साबण आढळल्याचे स्पष्ट केले आहे. त्या ग्राहकाने फ्लिपकार्टच्या बिग बिलिअन डेज सेलमध्ये एपल आयफोन १२ खरेदी केला होता, पण बदल्यात निरमा साबण मिळाल्याची तक्रार ग्राहकाने नोंदवली आहे. या व्यवहारासाठी ग्राहकाने तब्बल ५१ हजार रूपये मोजले होते.

गो एंड्रॉईड या नावाने टेक ब्लॉग चालवणाऱ्या एका व्यक्तीने ही घटना व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॉगमध्ये शेअर केली आहे. या फोनच्या डिलिव्हरीअंतर्गत तयार करण्यात आलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही घटना ४ ऑक्टोबरची आहे. ज्यामध्ये बिग बिलिअन डे च्या माध्यमातून खरेदी केलेला iphone 12 हा आयफोन फोन डिलिव्हर झाला. पण या फोनच्या पॅकिंगमध्ये फोनएवजी साबण आढळला. या डिलिव्हरीसाठी ग्राहकाने ओपन बॉक्सचा पर्याय निवडला होता. या व्हिडिओमध्ये ग्राहकाला पॅकेज ओपन करून दाखवण्यात आले. त्यानंतर ग्राहकाचा ओटीपी मागवला गेला. हे ओटीपीचे फीचर ग्राहकाच्या पथ्थ्यावर पडले.

व्हिडिओमध्ये दिसते की, पॅकेजिंग खोलल्यानंतर त्यामध्ये iphone 12 च्या एवजी साबण होता. त्यानंतर या ग्राहकाने डिलिव्हरी अपयशी ठरल्याचा प्रतिसाद टॅग केला. व्हिडिओमध्ये दिसते की पॅकेजिंग खोलल्यानंतर त्यामध्ये आयफोन 12 एवजी साबण दिसू आले. त्यानंतर फ्लिपकार्टकडूनही ही डिलिव्हरी फेल असल्याचे जाहीर करण्यात आले. ही डिलिव्हरी आऊट ऑफ डिलिव्हरी असल्याचेही दाखविण्यात आले. तसेच ही ऑर्डर रद्दही करण्यात आली. त्यानंत फ्लिपकार्टनेही कॉलबॅक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर डिलिव्हरी बॉयजेखील फेल्ड स्टेटससह निघून गेला.

पुन्हा एकदा विशमास्टर या डिलिव्हरी पार्टनरकडून ग्राहकाला वारंवार कॉल्स आहे. त्यामध्ये वारंवार ओटीपी विचारण्यात आला. ही संशयास्पद घटना वाटल्यानेच फ्लिपकार्टनेही ही ऑर्डर रद्द केली. त्यानंतर ग्राहकाला रिफंडही परताव्याच्या स्वरूपात देण्यात आला. अशा घटना सामान्यपणे घडत असता. पण अशा घटनेत मी फ्रॉडमधून नशीबाने वाचलो. म्हणूनच फ्लिपकार्ट ऑर्डर करताना Open box Delivery चा पर्याय निवडा असेही त्या ग्राहकाने आवाहन केले आहे.