घरटेक-वेकतुमचा फोन हॅक होतोय का ? कसे ओळखाल?

तुमचा फोन हॅक होतोय का ? कसे ओळखाल?

Subscribe

तुमचा फोन हॅक झाला आहे का नाही याची माहिती मिळू शकते.

 

सध्या स्मार्टफोन हॅकिंग होण्याचं प्रकार प्रचंड वाढले आहेत. अनेक मीडिया रिपोर्टनुसार मधून Pegasus Spyware  लोकांवर नजर ठेवून त्यांच्यावर जासूसी करत आहेत. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की, हॅकर्स फक्त प्रसिद्ध लोकांनाच टार्गेट करतात पण असं नसून अनेक मालवेअर आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने सामान्य माणसाचा फोन सुद्धा हॅक करण्यात येतो. यामागे अनेक कारणे असू शकतात पण सगळ्यात मोठं कारण म्हणजे लोकांसोबत फायनाशियल फ्रॉड करणे हे होय. अनेकदा सामान्य माणसाला कळत नाही की आपला फोन हॅक करण्यात आला आहे. यामुळे अनेकदा त्यांचा फायनाशियल अकाउंट मधील बँक डिटेल्स तसेच पैसे गमवावे लागताता. परंतु काही अशा टेक्निक्समुळे किंवा अशा काही गोष्टी फॉलो करून  तुमचा फोन हॅक झाला आहे का नाही याची माहिती मिळू शकते. किंवा या पासून वाचण्यासाठी काय करावे यासाठी आज तुम्हाला काही महत्वपुर्ण गोष्टींची माहिती देणार आहोत.

- Advertisement -
बॅटरी ड्रेन-

जर तुमच्या मोबाईलची चार्जिंग/बॅटरी पूर्वीपेक्षा जास्त लवकर संपत असेल तर तुम्हाला याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेकदा बॅकग्राऊंड मध्ये चालत असलेल्या मालवेअर सॉफ्टेअरमुळे मोबाईलची चार्जिंग लवकर संपते. तसेच याव्यतिरिक्त जर तुमचा परफॉर्मन्समध्ये अचानक कमी झाला असेल आणि मोबाईल वारंवार रिस्टारर्ट होत असेल तर मोबाईल युजर्सनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

मोबाईलमध्ये अनोळखी ॲपचा शिरकाव

तुमच्या मोबाईलमध्ये अचानक एखादा ॲप इंन्स्टॉल झाला असेल तर तुम्ही वेळीच सतर्कता बाळगत ॲप डिलीट करा. तसेच मोबाईलमध्ये होणाऱ्या बदलावाकडे कानाडोळा केला तर काही काळाने हे ॲप मोबाईल मध्ये फ्रीज होऊन जात आहे तसेच अनेकदा यामुळे पॉप ॲप ॲड सुद्धा यायला सुरुवात होते. प्रत्येक युजर्सने सावधानता बाळगत फोनमधील बँक पासवर्ड, इमेल्स आणि अन्य दुसऱ्या अकाउंटवर लक्ष ठेवावे.

- Advertisement -
मोबाईल डेटाचा वाढता वापर

एक इनफैक्टेड डिवाइस मैलिशियस सर्वरशी खूप जास्त प्रमाणात कम्यूनिकेट करतो. हा सर्वर ॲडिशनल मालवेयरला डाउनलोड करुन स्वत:ला अपडेट करतो. या व्यतीरिक्त कॅन्टॅक्ट,इमेज आणि दुऱ्या युजर्सच्या डेटाला सर्वरवर पाठवते राहतो. यामुळे तुमच्या मोबाईलचा डेटा म्हणजेज इंटरनेट वापर वाढल्याने नेटचा वापर जास्त होतो.


हे हि वाचा –  WhatsApp युजर्स सावधान; Pegasus Spyware चा तुमच्या प्रायव्हेट चॅटवर वॉच

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -