PSLV C- 42च्या उड्डाणासाठी इस्रो सज्ज

इस्रोने या आधीही इतर देशांच्या उपग्रहांचे उड्डाण भारतातून केले आहे. १० जुलै २०१५ रोजी PSLV C-28 उड्डाणामधून एकाच वेळी ५ ब्रिटीश उपग्रह अंतराळात सोडले होते. त्यानंतर आता हे आणखी व्यावसायिक उड्डाण  इस्रो करणार  आहे.

SHRIHARIKOTTA
(फोटो प्रातिनिधीक आहे.)

सहा महिन्याच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर इस्रो पुन्हा एकदा उड्डाणासाठी सज्ज झाली आहे. येत्या१६ सप्टेंबरला इस्रोकडून PSLV C- 42 चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याची तयारी पूर्ण झाली असून या ध्रुवीय प्रक्षेपणात एकही भारतीय उपग्रह नसणार आहे. ते उड्डाण पूर्णत: व्यावसायिक असणार आहे. ही तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे.

१६ सप्टेंबरला होणार उड्डाण

बंगळुरुच्या श्रीहरीकोट्टा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या उपग्रहाचे उड्डाण होणार आहे. १६ सप्टेंबरला रात्री १० वाजून ७ मिनिटांनी हे उड्डाण होणार आहे. PSLV C 42 मध्ये ब्रिटीश उपग्रह नोवासार 1 आणि एस-1-4 यांचा समावेश आहे. सर्रे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी या ब्रिटीश कंपनीने ते बनवले आहेत. या उपग्रहांना पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात येणार आहे.

NovaSAR-in-flight
नोवासार उपग्रहाचा प्रातिनिधीक आहे.

काय अभ्यासणार हे उपग्रह?

पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात येणार हे दोन्ही उपग्रह पृथ्वीचा अभ्यास करणार आहे. नोवासार १ पृथ्वीतील बदलाचे बारकावे टिपणार आहे. या उपग्रहाला पृथ्वीपासून ५८० किलोमीटर सूर्याच्या समान कक्षेत सोडले जाणार आहे. तर एस१-४ हा उपग्रह पृथ्वीच्या अभ्यासासाठी अवकाशात सोडला जाणार आहे. अंतराळातून १ मीटरपेक्षाही लहान वस्तू अंतराळातून न्याहाळू शकणार आहे. याचे वजन ४४० किलोग्रॅम असून पृथ्वीचा अधिक अभ्यास करण्यास हा उपग्रह मदत करणार आहे.

या आधीही व्यावसायिक उड्डाण

इस्रोने या आधीही इतर देशांच्या उपग्रहांचे उड्डाण भारतातून केले आहे. १० जुलै २०१५ रोजी PSLV C-28 उड्डाणामधून एकाच वेळी ५ ब्रिटीश उपग्रह अंतराळात सोडले होते. त्यानंतर आता हे आणखी व्यावसायिक उड्डाण  इस्रो करणार  आहे.

ऑक्टोबरमध्येही होणार उड्डाणे

बहुप्रतिक्षित GSLV MARK -3 D-2 आणि GSAT-29 या उपग्रहाचे उड्डाण होणार आहे. ही चंद्रयान मोहिम असून भारतीय अंतराळ संशोधनासाठी एक महत्वपूर्ण उड्डाण असणार आहे. या उड्डाणाची तारीख अजून ठरली नसली तरी हे उड्डाण ऑक्टोबरमध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे.